उल्हासनगरातील मोहिनी पॅलेस इमारत दुर्घटना इमारतीचे स्लॅब कोसळून पाच जणांचा मृत्यू ११ जण जखमी

उल्हासनगर – कॅम्प नं-१ मधील मोहिनी पॅलेस या चार मजली इमारतीच्या टेरेसचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत ५ जणांचा मृत्यू तर ११ जण जखमी झाले असून अनेक जण ढिगाऱ्यात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सदर चार मजल्याची इमारत १९९४ साली बांधण्यात आली. शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास इमारतीचा टेरेस स्लॅब चौथ्या, तिसऱ्या, दुसऱ्या, पहिल्या व तळमजल्यावर कोसळला. टेरेसचा स्लॅब थेट तळ मजल्यापर्यंत आल्याने इमारतीमधील २० ते २५ नागरिक यामध्ये अडकल्याची भीती सुरवातीला व्यक्त झाली. महापालिकेचे पथक, अग्निशमन दलाचे जवानांसह  पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरू केले. या इमारतीत ९ सदनिका आणि तळमजल्यावर ८ दुकाने असल्याची माहिती पालिकेने  दिली. दुर्घटना इमारतीच्या ठिकाणी बघ्यांची एकच गर्दी केल्याने, मदत कार्यात अडथळा निर्माण झाला होता. मदतकार्य सुरू असताना ठाणे आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

मोहिनी पॅलेस इमारतीचा पाचव्या मजल्यावरील स्लॅब कोसळताच इमारती मधील रहिवाशांनी घराबाहेर धाव घेतली. दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या दोघांना खिडकीचे गज कापून बाहेर काढावे लागले. तर ११ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. तळमजल्यावर ५ ते ६ रहिवासी अडकल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. त्यापैकी चौघांचे मृतदेह बाहेर काढले.  मॉन्टी मिलींद पारचे-१२, सावित्री पारचे-६०, हरीश डोडवाल-४३ व ऐश्वर्या हरेश डोडवाल-२३, संध्या हरेश डोडवाल-४२ असे मयत झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान  बेघर झालेल्या नागरिकांना संत थारासिंग दरबार यांनी मदतीचा हात दिला असून महापालिका त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणार असल्याचे संकेत पालिकेने दिले.

 301 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.