ठाण्यात प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे ‘मॉकड्रिल’

पावसाळ्यात घडणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज

ठाणे – ठाणे शहरात मान्सून सुरु होण्यापूर्वी धोकादायक इमारतीमध्ये दुर्घटना घडल्यास तात्काळ करावयाच्या उपाययोजनांची रंगीत तालीम घेण्याबाबत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्यावतीने आज नौपाडा, महात्मा गांधी रोडवरील नंदिनी निवास या सी-१ रिक्त इमारतीमध्ये ‘मॉकड्रिल ‘ घेण्यात आले.

 प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने मान्सुन कालावधीकरिता करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबाबतच्या आढावा बैठकीत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी मान्सून कालावधीत मान्सून कालावधीत शहरातील धोकादायक इमारतीमध्ये दुर्घटना घडल्यास आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने कसा प्रतिसाद दिला जातो याचा मॉकड्रिल घेण्याबाबत निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने ‘मॉकड्रिल’ घेण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त(२) संजय हेरवाडे, उप आयुक्त संदीप माळवी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम, अग्निशमन अधिकारी गिरीश झलके आदी उपस्थित होते.
ठाण्यातील नौपाडा, महात्मा गांधी रोडवरील नंदिनी निवास या सी-१ रिक्त इमारतीमध्ये मॉकड्रिल घेण्यात आले. या ठिकाणी इमारत कोसळून २ मजूर अडकल्याचे कळताच आपत्ती व्यवस्थापन विभाग कशा पद्धतीने काम करते याची रंगीत तालीम घेण्यात आली. यामध्ये आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांच्या नेतृत्वाखालील टीममध्ये १० आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, पोलीस यंत्रणा, २ ऍम्ब्युलन्स, टीडीआरएफच १५ जवान, अग्निशमन विभागाचे ३० कर्मचारी तसेच महानगर गॅसचे कर्मचारी याच्या समावेश होता.
ठाण्यात धोकादायक इमारतीमध्ये धोकादायक इमारतीमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास आरोग्य विभाग, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस यंत्रणा तसेच टीडीआरएफ या सर्वच यंत्रणांची तयारी कशी आहे, ते किती वेळात प्रतिसाद देतात. या प्रतिसादानंतर त्यांनी कशी तयारी केली आहे? आपल्या सर्व सामुग्रीची ते किती चपळाईने हाताळणी करतात ? हे सर्व या मॉकड्रिलमधून पाहण्यात आले. एकूणच शहरात कोणतेही दुर्घटना घडल्यास घटनस्थळी जावून नागरीकांच्या जिवीताचे रक्षण करणे तसेच वित्तहानी टाळण्यासाठी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापनची  संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे.

 261 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.