कोविड १९ म्युकरमायकोसिस आणि मौखिक आरोग्य – ठाणे जिल्हा दंतशल्यचिकित्सक डॉ. अर्चना पवार

ठाणे – जगभरातील संशोधक व वैज्ञानिक कोरोना विषाणू पीडित रुग्णांमध्ये आढळणार्‍या नवीन नवीन लक्षणे व व्याधी यांचा शोध घेत असून कोरोना विषाणू या रोगाचा नायनाट करण्यामध्ये प्रयत्नशील आहेत. कोरोनाची लागण झालेल्या बऱ्याच रुग्णांमध्ये वरच्या जबडयांना बुरशीजन्य (फंगल) आजाराचा संसर्ग दिसून येत आहे यालाच आपण म्यूकरमायकोसिस असे म्हणतो.

म्युकरमायसेटीस नावाच्या बुरशीमुळे संसर्ग होतो. ती पर्यावरणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असते मात्र जेव्हा मानवी शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते अशावेळेस म्यूकरमायकोसिसची लागण होते. या बुरशीचा कण श्वसाद्वारे शरीरात गेल्यावर फुफुस आणि सायनसेस वर दुष्परिणाम होतो. योग्यवेळी निदान व बुरशीप्रतिकारक उपचार केल्यास रुग्ण बरा होतो.

सध्या उपलब्ध शास्त्रीय माहिती नुसार दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांमध्ये दात हलणे हि प्राथमिक लक्षणे दिसून येत आहेत व काही रुग्णामध्ये हिडींना सूज येणे, हिडी मधून रक्त येणे, हिडीतून पू येणे, ड्रेनींग सायनस पायरीया (सामान्याकृत पेरीओडोनटायतीस) असे आढळून येत आहेत.

२०२० च्या संशोधनात असे आढळलेले आहे की म्युकरमायकोसीस ग्रे कैसेस है १००० रुग्णामध्ये ०.१४ रुग्ण अश्या प्रमाणात आहे. हि आकडेवारी विकसित देशांपेक्षा ८० पटीने जास्त आहे. डॉक्टर चक्रवर्ती व त्यांच्या सहायकांनी २००९ मध्ये म्युकरमायकोसीस चा वाढता क्रम दर्शवला व सलग पुढचे तीन वर्ष भारताच्या एकाच विभागातून ते संशोधन करत राहिले. या संशोधनात असे प्राप्त झाले की पहिल्या दशकात १२.९ केसेस प्रती वर्ष व पुढच्या ५ वर्षात ३५.६ केसेस प्रती वर्ष व शेवटच्या १८ महिन्यानमध्ये ५० केसेस प्रती वर्ष अढळले आहे. हि आकडेवारी कोविड १९ मारामारी मध्ये वाढत्या म्युकरमायकोसीस केसेस चा आढावा दर्शवते.

म्युफरमायकोसीस चा प्रसार

म्युकरमायकोसीस च्या अचूक प्रसाराची माहिती अद्याप प्राप्त नाही आहे. परंतु भारतामध्ये ज्युकरमायकोसीस चा प्रसार विकसित देशापेक्षा खूप जास्त आहे. आशयामुळे भारतामध्ये म्युकरमायकोसीस मुळे मृत्यूचे प्रमाण खूप जास्त आहे आणि त्याला कारणीभूत वैद्यकीय उपचार घेण्या मागे केलेली दिरंगाई व त्यामुळे योग्य निदान व उपचार करणे उशीर होणे हे आहे.

म्यूकरमायकोसिसची लक्षणे सर्वाधिक खालील कारणांमुळे आढळून येतात

प्रतिकारशक्ती कमी असलेली व्यक्ती इतर दिर्घकालीन आजार मुख्यतः डायबीटीस मेल्लीटस औषधोपचार ( स्टीरोइड्स चा गरजेपेक्षा जास्त वापर ), कर्करोग पिडीत रुग्ण.

आजाराची लक्षणे

डोके दुखणे, चेह-याला मुज येणे, ताप येणे, तोंडामध्ये गळू येणे व त्यामधून पू येणे, दातातुन पू येणे, दात हलणे जबड्याचे हाड उघडे पडणे, हिरडयांना सूज येणे व त्यातून रक्त येणे, डोके दुखणे, सायनसेसमध्ये रक्तसंचय आढळणे, डोळ्यांना सूज येणे व हालचाल कमी होणे, चेह-यावर सुज येणे व चेह-याची त्वचा काळी पडणे नाकात काळे सुके मल तयार होण दात काढल्यानंतर न भरणारी जखम इत्यादी लक्षणे दिसून येतात.

वरील लक्षणे आढळल्यास दंत अथवा मुख आरोग्य तज्ञांकडून त्वरित सल्ला घेणे आवश्यक आहे.निदान आणि तपासणी कसे करायचे?

रुग्णाची योग्य माहिती घेणे आवश्यक आहे. कोविड व स्टीरोईड ची तपशील माहिती घेणे आवश्यक असलेल्या रक्त तपासणी करणे. सी. टी स्कॅन, इंडोस्कोपी व बायोप्सीच्या साह्याने म्युकरमायकोसिसचे निदान करणे सोपे आहे.

उपचार

एम्पोटेरेसिन बी या इंजेक्शचा वापर सर्जिकल डिब्राईटमेंट, किंवा रॅडीकल सर्जरी करून उपचार करता येतो.

मात्र प्रत्येक कोरोन बाधित व्यक्तिला हा आजार होतो असे नाही. तसेच कोविड रुग्णांनी आपल्या मौखिक आरोग्याची निगा राखणे व काळजी घेणे हे गरजेचे आहे. कोरोनानंतर म्युकरमायकोसिसचा धाका असलेल्यानी १० ते २० दिवसांच्या आत तपासणी करून घेणे गरजेचे आहे व त्यामुळे संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. 

 276 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.