मुंबई – १९८३ च्या बॅचच्या निवृत्त आयएएस अधिकारी मेधा गाडगीळ यांची ‘मॅट’-महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण येथे सदस्य (प्रशासन) या पदावर नेमणूक करण्यात आली आहे. २९ वर्षानंतर एका महिला अधिकाऱ्यास हा बहुमान मिळत आहे. मॅटच्या अध्यक्षा न्यायमूर्ती मृदूला भाटकर यांच्या उपस्थितीत नुकतीच मेधा गाडगीळ यांनी सुत्रे स्वीकारली. मेधा गाडगीळ यांनी आपल्या ३६ वर्षाच्या सेवेत सहाय्यक जिल्हाधिकारी ठाणे , जिल्हाधिकारी अहमदनगर, सहसंचालक ऊद्योग, संचालक हाफकीन बायो., अप्पर मुख्य सचिव गृह(अपिल) व अ. मु. स. वैद्यकिय शिक्षण यासारख्या पदांवर काम केले आहे.
435 total views, 1 views today