मुंब्रा ते थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावर धावणार टी.एम.टी.ची वातानुकुलीत व्हॉल्व्हो बससेवा; प्रायोगिक तत्वावर बसच्या २ फेऱ्या होणार सुरू

ठाणे : मुंब्रा शहराचा झपाट्याने विकास होत असून अनेक विकासकामे पूर्णत्वास येत आहेत. मुंब्र्यामधील काही प्रवाशांना रेल्वे प्रवास करणे शक्य होत नसल्यामुळे मुंब्रा ते मुंबई अशी बस सेवा सुरु करावी, अशी मागणी वारंवार मुंब्र्यामधील रहिवाशांनाकडून कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे होत होती. त्यानुसार प्रायोगिक तत्वावर टी.एम.टी.ची वातानुकुलीत व्हॉल्व्हो बससेवा २ बस सेवा अक्षय्य तृतीया व रमजान ईद पासून सुरु होणार असल्याची माहिती खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी दिली.

मुंब्रा शहर हे नेहमी गजबजलेले शहर म्हणून ओळखले जाते, तसेच मध्य रेल्वे मधील वाढती गर्दी पाहता मुंब्र्यामधील नागरिक तसेच मुंबईत क्रॉफर्ड मार्केट (फुले मंडई) येथे जाणाऱ्या व्यापारी वर्गाची मागणी होती. मुंब्र्यावरून कमी अंतरावर जाण्याकरिता खाजगी वाहनांचा वापर करावा लागत असल्याने त्याचा खर्च सर्व सामान्यांना परवडत नाही. यामुळे मुंब्र्यावरून थेट मुंबई व कमी अंतरावर असलेल्या ठिकाणी जाण्याकरिता ठाणे परिवहन सेवेची मुंब्र्यावरून बस सेवा सुरु करण्यात यावी याबाबत खासदार शिंदे यांच्यासह परिवहन समितीचे सदस्य शमीम खान, बालाजी काकडे तसेच महापालिकेचे विरोधी पक्षनेते शानू पठाण प्रयत्नशील होते.
परिवहन सेवेचे सभापती विलास जोशी यांनी बस उपलब्ध झाल्याने शिंदे यांच्या सदर बस सेवा सुरु करण्याच्या मागणीला त्वरित मान्यता दिली असून प्रायोगिक तत्वावर टी.एम.टी.ची वातानुकुलीत व्हॉल्व्हो बससेवा २ बस सेवा अक्षय्य तृतीया व रमजान ईद पासून सुरु होणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. तेसच भिवंडी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी वातानुकुलीत बस सेवा लवकरच सुरू होणार असल्याचे परिवहन सेवेचे सभापती विलास जोशी यांनी यावेळी सांगितले.

 442 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.