नागरिकांनी नोंद घेण्याचे महापालिकेचे आवाहन
ठाणे – ठाण्यात विवियाना मॉलच्या पार्किंगमध्ये फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांसाठीच सुरु असलेले ‘ड्राइव्ह इन’ लसीकरण उद्या दिनांक १४ मे, २०२१ रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत सुरु राहणार असून नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
विविनाना मॉलच्या पार्किंग केंद्रावर नोंदणी केलेल्या ६० वर्षांवरील १०० जेष्ठ नागरीकांनाच फक्त कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात येत आहे. लसीकरणाची ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असून फक्त दुसऱ्या डोसच या केंद्रावर घेता येणार आहे.
तसेच लसीकरणाला येताना सोबत चालक किंवा काळजीवाहक म्हणून एक व्यक्ती सोबत असणे आवश्यक आहे. या केंद्रावर उद्या दिनांक १४ मे २०२१, रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत सुरु राहणार असून नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
488 total views, 2 views today