ग्रेट मराठा फाऊंडेशनच्या वतीने अल्प दारात “अन्नपूर्णा थाळी”

ग्रेट मराठा फाऊंडेशनच्या वतीने संस्थापक रोहित शेलटकर व मितेश देशमुख यांच्या पुढाकाराने केवळ 20 रुपयात दर्जेदार अशी” अन्नपूर्णा थाळी ” उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ठाणे – आज या कोविड महामारीचा दिवसात जे नागरिक व गरीब गरजवंत  यांना एक दिलासा म्हणून रोज २० रुपये प्रमाणे एक थाळी जेवणाची या संस्थेने नागरिकांसाठी खुले केले आहे.
अस्सल मराठमोळ्या पद्धतीने चे हे जेवण रुचकर व गरमागरम नागरिकांसाठी ठेवण्यात आले आहे.
हे जेवण करण्यासाठी ठाणे मधील सहा गरजवंत महिलाचां या मध्ये समवेश करण्यात आला आहे तर या कोरोणाचा दिवसात या महिलांचा हाताला ग्रँड मराठा स्वांथेने एक मदतीचा हात पुढे केला आहे.

ठाण्यातील जेल जवळील शनी मंदिरासमोर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.अन्नपूर्णा थाळी उपलब्ध करून देण्यात  कुठलाही व्यापारी वा नफ्याचा हेतू नाही.
आताच्या परिस्थितीत महिलांना काम मिळणे आणि गरजु लोकांना निर्मळ व स्वच्छ अन्न मिळणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.तुम्हालाही या कर्तव्यात सामील व्हायचे असेल तर,ग्रँड मराठा फाऊंडेशनच्या बँक खात्या मध्ये तुम्ही तुमचे योगदान देऊ शकता.बँकेची माहिती : खात्याचे नाव – ग्रँड मराठा फाऊंडेशन खाते क्रमांक – 50200030319170आय.एफ.एस.सी. (IFSC) – HDFC0000146 शाखा : एच डी एफ सी बँक, तलाव पाळी, ठाणे येथे आहे असे यावेळी राजेश तावडे यांनी सांगितले.सदर थाळी योजनेचे उद्घाटन प्रसंगी  प्रमुख उपस्थिती म्हणुन शिवसेना नगरसेविका  सौ नंदिनी राजन विचारे शहर प्रमुख हेमंत पवार ,नगरसेवक सुधीर कोकाटे ,प्रभाकर देशमुख राजेश मोरे परिवहन सदस्य कमलेश चव्हाण बाळा गवस व इतर मान्य वर उपस्थित होते.त्या वेळी दीपक रत्नपारखी राज वर्मा संदीप मरवडे लीना शिंदे व इतर कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

 410 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.