मोफत सैन्य भरती पूर्व मार्गदर्शन वेबिनार उत्साहात संपन्न

ठाणे – रोटरी क्लब ऑफ ठाणे व आगरी समाज मंडळ ठाणे परिसर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार  दि ९ मे २०२१ रोजी  संध्या ४ ते ६  वा झूम, वेबिनार,  फेसबुक लाईव्ह माध्यमातून मोफत सैन्य भरती पूर्व मार्गदर्शन वेबिनार आयोजित करण्यात आले. या वेबिनार  कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. उल्हास वैद्य, अध्यक्ष  ठाणे रोटरी क्लब,व विजय गावंड, अध्यक्ष आगरी समाज मंडळ ठाणे परिसर यांनी केले. रोटरी ठाणे जिल्हा (३१४२ ) गवर्नर डॉ. संदीप कदम यांनी मोफत सैन्य भरती पूर्व मार्गदर्शन वेबिनार बद्दल माहिती दिली.

 १९८३ पासून आजतागायत मुलामुलींना सैनिकी प्रशिक्षण देण्याच्या कार्यात स्वत:ला झोकून देणारे मेजर सुभाष गावंड यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी लॉक डाऊन काळात सुद्धा मोफत सैन्य भरती पूर्व मार्गदर्शन  वेबिनार ,झूम, फेसबुक लाईव्ह, माध्यमातून त्यांनी  (१० वी / १२ वी पास / जवान पोस्ट) यावर  सखोल मार्गदर्शन केले, तर कमांडर पटनायक यांनी सुद्धा (पदवीधर / अधिकारी पद) यावर मार्गदर्शन केले  व  कमांडर पटनायक  यांनी  यावेळी उमेदवारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.  वेबिनारचे  सूत्रसंचालन नूतन डाकी यांनी केले. या मोफत सैन्य भरती पूर्व मार्गदर्शन वेबिनारला  झूम , फेसबुक लाईव्ह  माध्यमातून १० वी / १२ वी पास आणि पदवीधर विद्यार्थी उमेदवारांनी उपस्थित राहून लाभ घेतल
 मोफत सैन्य भरती पूर्व मार्गदर्शन  रोटरी क्लब ऑफ ठाणेच्या फेसबुक पेजवर https://www.facebook.com/Rotaryclubthane उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी
संपर्क-९८२००४५१६५.९८१९७०३८८८.

 416 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.