शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने करावे

भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांची मागणी

 ठाणे – राज्यातील हजारो शिक्षकांच्या सेवा कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी अधिग्रहित केल्या आहेत अशा सर्वच शिक्षकांचे लसीकरण प्राधान्याने करण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी शासनाकडे केली आहे.
याबाबत अनिल बोरनारे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यात शिक्षकांना विलगिकीरण कक्ष, सर्वेक्षण, चेकपोस्ट व अन्य ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे. अशा ठिकाणी कोरोना संसर्गाची शक्यता अधिक असते. यामुळे शिक्षकांना सुरक्षित ठेवण्यासाठी अश्या शिक्षकांचे संपूर्ण लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यातच लसीकरण आरोग्य सेतू व अन्य ऍप वर नोंदणी सक्तीचे केल्याने व नोंदणी आधीच बुक होत असल्याने अनेक शिक्षक नोंदणीपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे शिक्षकांना नोंदणी सक्तीचे न करता ऑफलाईन ने प्राधान्याने देण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना द्याव्यात अशी मागणी अनिल बोरनारे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
विना अनुदानित, अंशतः अनुदानित तसेच सेल्फ फायनान्स शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतरांच्या सेवा कोरोना प्रतिबंधक कामासाठी अधिग्रहित करायच्या असतील तर शासनाने या शाळांमधील शिक्षकांना ५० लाखाचे विमा कवच तसेच विमा संरक्षण योजना लागू करावी अशीही मागणी अनिल बोरनारे यांनी शासनाला केली आहे.

 508 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.