मान्सून २०२१ पुर्वतयारी ऑनलाईन आढावा
ठाणे दि – पावसाळा जवळ आला आहे.रस्त्यावरील खड्डे, प्रलंबित कामे, २५ मे च्या अगोदर सर्व कामे मार्गी लावा अशा सुचना नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सून २०२१ पुर्वतयारी बाबींच्या पूर्वतयारीची ऑनलाईन आढावा बैठक घेतली.यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाषदादा पवार, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे, ठाणे महानगर पालिका आयुक्त बिपीन शर्मा,निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.शिवाजी पाटील,पोलीस आयुक्त सदानंद दाते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार यांसह सर्व महानगरपालिकांचे आयुक्त व विविध विभागांचे अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री शिंदे यांनी सहा महानगर पालिकांचे आयुक्त यांच्याकडून मान्सुन पुर्व तयारी ऑनलाईन आढावा घेतला व संबधिताना सुचना केल्या.प्रलंबीत कामे,नालेसफाई,रस्तावरील खड्डे,यांची कामे त्चरीत मार्गी लावा.आपत्ती काळात मदतीसाठी बोटी भाड्यांनी घेऊन ठेवणे.
कोरोनाचा प्रादुभार्व असल्यामुळे पावसाळात विज खंडीत होणार नाही यासाठी विद्युत विभागाने विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.कोरोना सेंटरची पावसामुळे काही नुकसान होणार नाही यांची काळजी संबधीतानी घ्या.अती धोकादायक इमारतीमधून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थळातरीत करण्याचा सुचना पालकमंत्री शिंदे यांनी दिल्या.
558 total views, 1 views today