कोवीड रुग्णांसाठी वाजवी दरात रिक्षा

अंबरनाथ – कोवीड रुग्णांच्या सेवेसाठी अंबरनामध्ये वाजवी दरात रिक्षा सेवा सुरु करण्यात आली आहे. तसेच लसीकरणासाठी येण्या जाण्यासाठी देखील या सेवेचा लाभ नागरीकांना घेता येणार आहे. अंबरनाथमधील रिक्षा चालकांनी उचललेल्या या पावलाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या  लाटेमुळे आरोग्यव्यवस्थेवर ताण आला असून कोरोना चाचणी साठी येणाऱ्या  नागरिकांना घरापासून ते चाचणी केंद्रापर्यंत जाण्यासाठी वैयक्तीक वाहनाचा वापर करावा लागतो. जर कोणाकडे वैयिक्तक वाहन नसेल तर सार्वजनिक वाहनातून प्रवास करावा लागतो. अशा वेळी रुग्ण कोरोना बाधीत असल्यास प्रवासादरम्यान रोगाचा प्रसार इतर सह प्रवाशांना किंवा बेसावध रिक्षा चालकाला होण्याच्या असंख्य घटना घडत आहेत. अॅब्युलन्सची कमी संख्या व त्याचे वाढीव दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने कोवीड रु ग्णांना पर्याय म्हणून कोवीड असंक्षित सार्वजनिक वाहनांना पर्याय म्हणून अंबरनाथ शहरांमध्ये नागरिक सेवा मंडळ व अंबरनाथ सिटिझन्स फोरम यांनी तेथीलच सेवा भावी असलेले ‘जिवदानी ऑटो  अॅब्यूलन्स ‘ या नावाने सेवा सुरु  करण्याचा मानस होता. यासाठी सर्व अटींची पूर्तता करून सध्या २५ रिक्षा अंबरनाथ येथे वाजवी दरात रु ग्णांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यात आणखी २५ रिक्षाचा समावेश होणार आहे. सोमवारी या उपक्रमाचा शुभारंभ अंबरनाथ मध्ये करण्यात आला. वाहतुक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांचे हस्ते प्रातिनीधीक स्वरु पात याचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी दत्ता तोटेवाड व अंबरनाथ वाहतुक उपविभागाचे पोलीस निरिक्षक जाधव तसेच या उपक्र मा मध्ये अग्रभागी असलेले अंबरनाथ सिटिझन्स फोरम चे बर्मन जिंवदानी रिक्षा युनियन चे देशपांडे हे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होत

 484 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.