मेहतर समाजावर जातीवाचक टिप्पणी

तारक मेहता फेमवर बबितावर अ‍ॅट्रोसिटी  दाखल करण्याची मागणी
 ठाणे – मेहतर समाजाबाबत आक्षेपार्ह टीप्पणी करणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (बबीता) हिच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा अशा  मागणीचे निवेदन  रिपाइं एकतावादीचे युवा नेते भैय्यासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्मिकी सेलचे अध्यक्ष महेश घारुन यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात दिले आहे. मुनमुन दत्ता हिच्यावर गुन्हा दाखल न केल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम मुनमुन दत्ता (बबीता)   ही एक सिने/नाट्य अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीने चित्रीत केलेला एक व्हीडीओ सध्या समाजमाध्यमांवर वायरल होत आहे. या व्हिडोओमध्ये तिने  महेतर समाजाचा जातीवाचक उल्लेख करुन  महेतर समाज हा गलिच्छ असल्याचे अधोरेखीत केले आहे. ती आपल्या व्हिडीओमध्ये असे म्हणते की, “मुझे ब्लॉग शुरु करना है, उस के लिये मुझे अच्छा दिखना है नही तो मै भंगी दिखूंगी!”   तिच्या या वाक्यातून विशिष्ठ समाजाला गलिच्छ ही संज्ञा तिने लावली आहे. एखाद्या उच्चशिक्षित महिलेने अशा पद्धतीने विधान करुन जाणीवपूर्वक अनुसूचित जातींमधील एका वर्गाला घाणेरडे असे संबोधून त्यांचा अवमान केला आहे. हा प्रकार  भादंवि 153 अ आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 च्या सुधारीत 2015 या कायद्यातील तरतुदीनुसार  कलम 3 (1)2,  3 (1) 10 अन्वये गुन्हा ठरत आहे. त्यामुळे मुनमुन दत्ता हिच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महेश घारु यांनी केली आहे.
दरम्यान, मुनमुन दत्ता हिच्यावर गुन्हा दाखल न केल्यास आगामी आठ दिवसांत रिपाइं एकतावादीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल. मुनमुन दत्ता हिचे ज्या ठिकाणी चित्रीकरण सुरु आहे. तेथे जाऊन तिच्या तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशाराही घारु यांनी दिला आहे.

 311 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.