ठाणे – ठाण्यात आजही ऑक्सीजनसाठी महापालिकेची तारेवरची कसरत सुरु आहे. रोजच्या रोज कंपनीच्या ठिकाणी जाऊन महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ऑक्सीजनसाठी पाठपुरावा करावा लागत आहे. परंतु आता महापालिकेने स्वत:चे ऑक्सीजन प्लान्ट उभारण्यास सुरवात केली आहे. त्यात आता इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज या स्वंयसेवा संस्थेने ठाण्यासाठी १५ ऑक्सीजन सिलेंडर,१५ ऑक्सीजन कंसन्ट्रेटर आणि तीन व्हॅन्टीलेटर दिले आहेत.
ठाणे महापालिका हद्दीत सध्या रुग्णांची संख्या घटत आहे. परंतु तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने पालिकेने त्यासाठीची तयारी आतापासूनच सुरु केली आहे. त्यानुसार पालिकेने दोन ऑक्सीजन प्लान्ट उभारण्याचे निश्चित केले आहे. हे प्लान्ट सुरुही केले आहेत. तसेच विविध कंपन्याकडून देखील पालिकेच्या माध्यमातून रोजच्या रोज पाठपुरावा करुन ऑक्सीजनचा साठा उपलब्ध करुन घेतला जात आहे. त्यात आता महापालिकेच्या किंबहुना शहराच्या मदतीला काही सामाजिक संस्था देखील पुढे येऊ लागल्या आहेत. त्यानुसार आता असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज या स्वयंसेवी संस्थेन शहरासाठी १५ ऑक्सीजन सिंलेडर देऊ केले आहेत. यातील प्रत्येक सिंलेडरमधून १५ लीटर ऑक्सीजनचा पुरवठा होणार आहे. त्यानुसार सोमवारी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ते सुपुर्द करण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी तथा ठाणो महापालिकेचे शिक्षण मंडळ सभापती योगेश जाणकर यांच्यासह त्यांच्या सहका:र्यानी हे सिलेंडर शिंदे यांच्याकडे सुपरुद केले. यावेळी १५ ऑक्सीजन कंसन्ट्रेटर आणि तीन व्हॅन्टीलेटरही देण्यात आल्याची माहिती जानकर यांनी दिली.
509 total views, 1 views today