वांगणीच्या डॉक्टर गुप्ताविरोधात गुन्हा दाखल 

दोन दिवसात कोरोन बारा करण्याचा दावा करणाऱ्या वांगणीच्या डॉक्टर गुप्ताविरोधात गुन्हा दाखल  परवानगीशिवाय कोविड हॉस्पिटल चालवत असल्याचा ठपका
बदलापूर – वांगणीतील एक डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना अवघ्या दोन दिवसात बरे करत असल्याचा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी या डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या डॉक्टरने वांगणीमध्ये कोणतीही परवानगी न घेता कोरोना रुग्णांवर उपचार सुरू केला होता. त्यामुळे त्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून योग्य ती परवानगी नघेता रुग्णावर उपचार करणे हे डॉक्टर गुप्ता महागात पडले आहे.  

वांगणीतील डॉक्टर उमाशंकर गुप्ता गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करत होता. होमिओपॅथी पद्धतीने उपचार करत असल्याचे सांगत तो रुग्णांवर वांगणीत उपचार करत होता. याबाबत त्याने दोन दिवसात रुग्ण बरे केल्याचे दावे करणारे काही व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केले होते. हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाला आणि  रुग्णाची उपचारासाठी वाढ झाली. या व्हिडिओची दखल घेत अंबरनाथचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील बनसोडे यांनी बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात डॉक्टर उमाशंकर गुप्ता यांच्याविरोधात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी उमाशंकर गुप्ता यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 गुप्ता हे वांगणी मध्ये एका दहा बाय वीस च्या खोलीमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहेत. त्यांच्या उपचारांमुळे अनेकांचे जीव वाचलाचा दावा होत असल्याने राज्यातून आणि परराज्यातून देखील रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत होते. मात्र कोरोणा रुग्णांवर उपचार करताना जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून योग्य ती परवानगी घेणे गरजेचे होते. मात्र गुप्ता यांनी कोणतीही परवानगी न घेता कोरोना रुग्णांवर उपचार सुरू केला होता. गुप्ता हे कोरोणा रुग्णांना दोन दिवसात बरे करीत असल्याचा दावा अनेक जण करत असले तरी त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी मात्र कोणीही पुढे येत नव्हते. त्यामुळे त्यांच्या उपचाराची नेमके पद्धत कोणती हे अद्यापही गुलदस्त्यातच राहिले आहे, तर दुसरीकडे गुप्ता यांना रोखण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 304 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.