८ ते १५ मे पर्यंत बदलापूर शहरात कडक लॉकडाऊनला जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी

बदलापूर –  राज्य शासनाने लागू केलेल्या लॉक डाऊन आणखीन कडक करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर बदलापूर पालिकेने घेतला आहे . पालिकेच्या या निर्णयाला जिल्हाधिकाऱ्यांनी देखील मंजुरी दिली. आमदारांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मेडिकल स्टोअर, बँक आणि रुग्णालय सेवा वगळता सर्व अत्यावश्यक सेवा देखील आठवडाभर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी शनिवारपासून सुरू करण्यात आली आहे एकीकडे राज्य शासन नागरिकांना कमीत कमी त्रास होईल त्या अनुषंगाने लॉक डाऊन मध्ये शिथीलता आणत नवनवीन प्रयोग करीत आहे. तर दुसरीकडे बदलापूरातून कोरोना हद्दपार करण्याच्या उद्देशाने पालिका प्रशासनाने शहरात कडक लॉक डाऊन जाहीर करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू केले आहेत. शनिवारपासून पुढचे सात दिवस शहरात कडक लॉकडावून जाहीर करीत नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. या कडक लॉक डाऊन मध्ये मेडिकल स्टोअर,बँक आणि दवाखाने वगळता सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने देखील बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयाला जिल्हाधिकाऱ्यांनी देखील शुक्रवारी रात्री उशिरा मंजुरी दिली असून आता शनिवारी सलग सात दिवस बदलापूर शहरात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. बदलापूर शहरात लोक डाऊन लागावा यासाठी आमदार किसन कथोरे यांनी पालिका सभागृहात सर्वपक्षीय सदस्यांची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत या संदर्भातला निर्णय घेऊन अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले होते ा निर्णयाला जिल्हाधिकार्‍यांनी देखील समर्थन दर्शवित बदलापुरात खडक लोक डाऊन जाहीर केला. मात्र या लोक डाऊन साठी भाजपाचे आमदार कथोरे यांनी पुढाकार घेतल्याने इतर पक्षांनी मात्र आता या कडक लॉकडाऊनला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. कडक लॉकडाऊन मुळे नागरिकांचे हाल होणार असल्याचे मत शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे. हे लॉकडाऊन रद्द करावे या मागणीसाठी म्हात्रे यांनी पालिका सभागृहात ठाण मांडून आपला निषेध व्यक्त केला. तर पोलिस प्रशासनाने आज पासून कडक लॉकडाऊनच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे

 266 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.