बदलापुरमध्ये लॉकडाऊनला शिवसेनेचा विरोध

बदलापूरच्या कडक लॉकडाउन वरून राजकारण पेटलं शिवसेना आणि भाजपा मध्ये आरोप-प्रत्यारोप
 बदलापूर – बदलापूर शहरात आजपासून आठ दिवसाचा कडकडीत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र या लॉकडाऊनला शिवसेनेने विरोध केला आहे. बदलापूर शहरातील रुग्णसंख्या आधीच कमी होत असताना आता आणखी लॉकडाऊनची गरज काय आहे? असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. तसेच यासंदर्भात जाब विचारण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी पालिका कार्यालयात ठाण मांडला होता. बदलापूर शहरात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता बदलापूर पालिकेने शहरात मुरबाड पॅटर्नप्रमाणे सात दिवसाचा कडकडीत लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामध्ये मेडिकल,बँक आणि दवाखाने वगळता इतर सर्व दुकाने आस्थापना बंद करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. मात्र आधीच शासनाने ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत दुकानांना परवानगी दिलेली असताना आणि या मोहिमेमुळे शहरातील रुग्णसंख्या कमी होत असताना आता पुन्हा हा कडकडीत लॉकडाऊन करण्याची गरज काय आहे? असा सवाल शिवसेनेनं विचारला आहे. तसेच आजपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला शिवसेनेनं विरोध केलाय. हाच विरोध दर्शवण्यासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे हे आज सकाळपासून बदलापूर पालिकेच्या सभागृहामध्ये ठिय्या मांडून बसले. मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी आमच्या समोर येऊन आम्हाला स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली आज. मात्र ही घोषणा केल्यापासून, म्हणजेच गुरुवारपासून दीपक पुजारी हे बदलापूर पालिकेत फिरकलेलेच नाहीत. त्यामुळे जोपर्यंत पुजारी हे समोर येऊन आम्हाला स्पष्टीकरण देत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, अशी भूमिका वामन म्हात्रे यांनी घेतली आहे.
आमदार किसन कथोरे यांनी साधला शिवसेनेवर निशाणा बदलापूर शहरात कडकडीत लॉकडाऊन लावण्यात आला असून शिवसेनेने मात्र याला विरोध केला आहे. यावरूनच आता मुरबाड विधानसभेचे भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधत शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. फक्त ठेकेदारी बंद झाली म्हणून लॉकडाऊनला विरोध केला जात असल्याचा आरोप आमदार किसन कथोरे यांनी केला आहे  

 388 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.