नवी मुंबईत म्युकर मायकोसिस रुग्णसंख्येत वाढ

मधुमेह व रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांनी काळजी घेणे आवश्यक

मुंबई –  म्युकर मायकोसिस या आजाराने  कोरोनाग्रस्त रुग्णांच्या चिंतेत अजून भर टाकली असून नागपूर, मुंबई, नाशिक व पुणे नंतर नवी मुंबईत सुद्धा या आजाराचे रुग्ण  आढळून येत आहेत. नवी मुंबईतील प्रख्यात तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर येथे गेल्या महिनाभरात म्युकरमायकोसिसची लागण झालेल्या  ५ रुग्णांवर यशस्वी उपचार केले जात आहेत.  करून झालेल्या रुग्णगांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते अश्या रुग्णांना मधुमेह व किडनीचे आजार असतील तर म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा संसर्ग कोरोनाग्रस्तांना होतो. कोरोना संक्रमणाच्या आधी असे रुग्ण खूपच दुर्मिळ होते परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या आजाराची व्याप्ती वाढली आहे. या आजारात नाकाच्या बाजूला असलेल्या हाडाच्या मोकळ्या जागेत सायनसमध्ये या बुरशीची वाढ होते व त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी असेल तर ही बुरशी वेगाने वाढते व पुढे रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन रक्तप्रवाहाला अडथळा आणते. ” म्युकरमायकोसिस हे एक प्रकारचं फंगल इन्फेक्शन आहे. नाक आणि डोळ्याला हे इन्फेक्शन होतं. आणि डोळे आणि नाकाच्या मार्गाने मेंदूपर्यंत पोहोचतं. वेळीच योग्य उपचार न मिळाल्यास या आजाराने मृत्यू ओढवतो. एवढं हे इन्फेक्शन्स धोकादायक असतं. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी या आजाराबाबतची माहिती समोर आली होती. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या आजाराने अनेकांची दृष्टीच हिरावून घेतली आहे. म्युकर मायकोसिस हे फंगल इन्फेक्शन आहे. हे इन्फेक्शन शरीरात वेगाने पसरते. त्याला ब्लॅक फंग्स म्हणतात. मेंदू, फुफ्फुस आणि त्वचेवर याचं इन्फेक्शन होतं. या आजारात डोळ्यांची दृष्टीही जाते. काही रुग्णांच्या नाकाची हड्डी ठिसूळ होते. वेळीच उपचार न केल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो अशी माहिती डॉ. संजय जोशी यांनी दिली. 

 342 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.