लसीकरणासाठी मिळणार रंगीबेरंगी कुपन 

ठाणे : कोरोना प्रतिबंधक लसीकरणसाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच लसीकरणात अधिकाधिक सुसत्रता आणण्यासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाने लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना रंगीबेरंगी कुपन्स देण्याची शक्कल लढवली आहे.

देशात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास प्रारंभ झाला. प्रारंभीच्या काळात ६० वर्षांवरील ज्येष्ठांना तसेच आरोग्य सेवेतील कर्मचारी, पोलीस व अन्य शासकीय सेवांमधील फ्रंटलाईन वर्कर्ससाठी लसीकरण सुरू होते. त्यामुळे ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात तळमजल्यावर तसेच परिचारिका वसतीगृह तसेच अति महत्वाच्या व्यक्ती कक्ष असे तीन ठिकाणी लसीकरण करण्यात येत होते. मात्र केंद्र शासनाने १८ ते ४४ च्या वयोगटासाठी लसीकरण सुरू केल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात लसीकरणासाठी ओघ वाढला. मात्र त्यातच कोरोनाची दुसरी लाट आणि १८ ते ४४ वयोगटाच्या व्यापक लोकसंख्येचा समावेश लसीकरणात करण्यात आला. त्यात लसीचा अपुरा साठा आणि लसीकरणासाठी येणारे हजारो नागरिक याचे व्यस्त प्रमाण यामुळे जिल्हा शासकीय रूग्णालयात लसीकरणासाठी येणारी गर्दी आटोक्यात आणतांना रुग्णालय व्यवस्थापनला नाकी नऊ येत आहेत.
   नियमीत लसीकरण सुरू झाल्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी आम्ही विविध रंगांचे व तारखांचे कुपन्स नागरिकांना देणार आहोत. सध्या आपण लसीचे २०० डोस देत आहोत. मात्र यापुढील काळात लसीचा जेवढा साठा उपलब्ध असेल तेवढ्याच कुपन्सचे वाटप करण्यात आले. हे कुपन्स ४५ वर्षावरील व नोंदणी न करणाऱ्या नागरिकांनाच देण्यात येणार आहेत. १८ ते ४४ वयोगटातील तरूणांना लसीकरणासाठी शासनाच्या आदेशानुसार संबंधित अॅप्स वरनोंदणी बंधनकारकच आहे. अशी माहिती डॉ. कैलास पवार, ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

 282 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.