मातीचा भराव सरकल्याने गॅसवाहिनी तुटली

ठाणे: ठाण्यात पुन्हा एकदा महानगर गॅसवाहिनी तुटल्याची घटना शनिवारी दुपारी घोडबंदर रोडवरील ठाणे महापालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या परिसरात घडली. याचा फटका आयुक्तांच्या बंगल्यासह इतर ३०० कनेक्शन असलेल्या ग्राहकांना बसला आहे. यामध्ये रस्त्याचे काम सुरू असताना मातीचा भराव सरकल्याने ही गॅस वाहिनी तुटल्याची माहिती सूत्रांनी दिली.
          शनिवारी दुपारी घोडबंदर रोड पातलीपाडा येथील ठामपा आयुक्तांच्या बंगल्याच्या परिसरात पुन्हा गॅसवाहिनी फुटली आहे. तेथेही रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. याचदरम्यान तेथे मातीचा भराव सरकला आणि त्याच्या वजनाने महानगर गॅसवाहिनी तुटली. यामुळे गॅस गळती होण्यास सुरू झाली. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष, एमजीएल आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी होणारी गॅस गळती तातडीने थांबली. या घटनेत कोणीही जखमी झाले नसून ही वाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी साधारणपणे तीन तास लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच या गळतीचा फटका त्या वाहिनीवरील ३०० ग्राहकांना बसला असून घटनास्थळी एक फायर इंजिन पाचारण केल्याची माहिती कक्षाचे अधिकाऱ्यांनी दिली

 313 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.