डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने कोविड रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनचे वाटप

डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या पुढाकाराने कोविडग्रस्त रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन मोफत

डोंबिवली –  संपूर्ण जगभरासह महाराष्ट्रात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची मोठ्या संख्येने वाढ होत आहे. याचा आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. कोरोना रुग्णांसाठी आवश्यक, ऑक्सिजन पुरवठा, औषधे आणि हॉस्पिटलमधील बेड यांचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकारकडून विविध पावले उचलण्यात येत आहेत. अनेक राज्यांनी कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी निर्बंध लागू केले आहेत. काही राज्यांमध्ये लॉकडाऊनदेखील लागू करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने देखील राज्यात लॉकडाऊन लागू केले आहे. नागरिकांनी कोरोना संसर्गाच्या बाबतीत खबरदारी घ्यावी यासाठीच्या सूचना सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांना देण्यात येत आहेत. विविध पातळीवर जनजागृती करण्यात येते आहे.
त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील बहुतांश महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच रुग्णास ऑक्सिजनची गरज भासल्यास किंवा संवेदनशील परिस्थितीत रुग्णास जिल्ह्याअंतर्गत अथवा जिल्हाबाह्य रुग्णालयात घेऊन जात असताना, ऑक्सिजन अभावी रुग्ण वाटेतच दगावले असल्याची घटना देखील घडत असते. त्याचअनुषगाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून उपचारासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची तसेच ऑक्सिजन खाटांची उपलब्धता कमी पडत आहे. रुग्णांना रुग्णालयात दाखल होईपर्यंत लागणाऱ्या कालावधीत रुग्णांची ऑक्सिजनची पातळी योग्य प्रमाणात राहावी या दृष्टीकोनातून डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना बाधित रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन बँक योजना सुरू करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे सदर योजनेचा लाभ कल्याण, डोंबिवली, व इतर शहरांतील कोरोना बाधित रुग्णांना घेता येणार आहे. या योजनेद्वारे कोरोनामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेल्या रुग्णांना घरच्या घरी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर द्वारे ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. यावेळी माजी महापौर विनिता ताई राणे, जिल्हाप्रमुख गोपळ लांडगे, उपजिल्हा प्रमुख सदानंद थर्वल, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, शहर प्रमुख राजेश मोरे, राजेंद्र चौधरी, नगरसेवक दीपेश म्हात्रे नगरसेवक विश्वनाथ राणे विधानसभा संघटक तात्या माने,राजेश कदम, सागर जेधे, संजय पावशे, एकनाथ पाटील, राहुल म्हात्रे उपस्थित होते.

 343 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.