डोंबिवलीतील रुद्रा इनेमल वर्क प्रा.लिच्या मालकाचे अपहरण

डोंबिवली – डोंबिवली पुर्वे एमआयडीसी येथील रुद्रा इनमल वर्क प्रा.ली.कंपनीचे मालक रंजित झा यांना शुक्रवारी  दुपारच्या दरम्यान सहा अनोळखी इसमांनी अपहरण केल्याची घटना घडली समोर आली आहे.  भररस्त्यात घडलेल्या या घटनेत परिसरात घबरहाट पसरली आहे.या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अपहरणकर्त्यांवर गुन्हा दाखल आहे.पोलिसांनी अपहरणकर्त्यापैकी तीन जणांना अटक केली असून आणखी तीन फरार अपहरणकर्त्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत. झा यांचे अपहरणकर्त्यांबरोबर पूर्वीं भांडण झाले होते. त्याचा राग मानत धरून झा यांचे अपहरण करून त्यांचा मारहाण करण्यात आली होती.  मानपाडा पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार शरद प्रकाश शेट्टे उर्फ बाबू ,प्रतिक जनार्धन कचरेकर,समीर दत्तात्रय मोरे असे अटक केलेल्या अपहरणकर्त्यांची नावे आहेत. रुद्रा इनमल वर्क प्रा.ली.कंपनीचे मालक रंजित झा यांचा मुलगा सुरज रंजित झा यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात अपहरणकर्त्यां गुन्हा नोंदविण्यात आला आहे.   झा यांची पुर्वेकडील एमआयडीसी येथे इनॅमल साईन बनवण्याची कंपनी आहे. मुलगा सुरज याला झा यांनी फोन करून एटीएम मधून पैसे काढून डोंबिवली फेज प्लंट नंबर रुद्रा इनेमल वर्क प्रा.लि.येथे येण्यास सांगितले. सुरज झा याने एटीएममधून पैसे काढून  कंपनीच्या गेटवर पोहोचला.गेट समोर आल्यावर सुरजने पहिले कि, ५ ते ७ अनोळखी इसम वडिलांना मारहाण करून जबरदस्तीने कार मध्ये बसवत होते.तेव्हा सुरज झाने अपहरणकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता अपहरणकर्त्यांनी त्यालाही  मारहाण करून जखमी केले. त्यावेळी  गेटवरील वॉचमन रामू जगताप याने  दिवा येथील समीर मोरे व इतर पाच ते सात जनांनी ऑफिस बाहेर येवून रंजित झा यांना शिवीगाळ व दमदाटी करत गाडीत बसवल्याने सांगितले. झाला प्रकार सुरज झा यांनी आपला मोठा भाऊ विशाल याला सांगितला व दोघे भाऊ वडिलांनाचा शोध घेऊ लागले तेव्हा  दातिवली स्मशानभूमी समोर रंजित झा  हे रक्तबंबाळ आढळले. आपल्या वडीलां वाचवण्याकरिता अनोळखी इसम आणि दोन्ही भावात झटापटी झाली. काही वेळातच मुंब्रा-दिवा पोलिसांनी हस्तक्षेप करून गुन्हगारांना ताब्यात घेतले. अपहरणकर्ते शरद प्रकाश शेट्टे उर्फ बाबू , प्रतिक जनार्धन कचरेकर आणि समीर दत्तात्रय मोरे यांना ताब्यात घेऊन मानपाडा पोलिसांच्या स्वधीन केले.  पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून सहा जणांनी अपहरण करून लोखंडी रॉडने मारहाण  रंजित झा यांनी पोलिसांना सांगितले.

 682 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.