आमदार संजय केळकरांकडून  मिळणार  एस टी कामगारांना मिळणार समतोल आहार 

समतोल सेवा फाउंडेशन सामाजिक संस्थेचा  उपक्रम..

ठाणे  – आमदार संजय केळकर यांच्या मार्फत, समतोल सेवा फाउंडेशन या संस्थेच्या वतीने खोपट एस टि बस स्थानकातील चालक, वाहक व कर्मचारी यांना या लॉकडाऊन काळात मोफत समतोल आहाराची ( टिफीन) व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी समतोल फाउंडेशनचे विजय जाधव उपस्थित होते. 

कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच अनेकदा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची जेवणाची गैरसोय होते. सकाळी लवकर घराबाहेर पडल्यामुळे घरून डबा आणणे शक्य होत नाही .त्याच अनूषंगाने समतोल फाउंडेशन वतीने अत्यावश्यक सेवेतील कर्मच्याकरिता मोफत टिफीन सेवा सुरू करण्यात आली आहे  नोंदणी केलेल्या ५० कर्मचाऱ्यांना ही सेवा सुरु केल्याचे आ. केळकर यांनी सांगितले.  लॉकडाऊन मुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे तर काही जण आपला जीव धोक्यात घालून आपले कर्त्यव्य एकनिष्ठेने पार पाडत आहेत, कोरोना योद्धा म्हणून काम करत आहेत. अशा लोकांना मदतीचा हात म्हणून तसेच आपलेही कर्त्यव्य असलेल्या भावनेतुन  एस टी कर्मचाऱ्यांना मोफत जेवण टिफीन ची व्यवस्था केली असल्याचे आ. केळकर यांनी सांगितले अशा काम करणाऱ्या व्यक्तींच्या मागे समाजाने पाठीशी उभे राहुन त्यांना पाठबळ दिले पाहिजे असेही ते म्हणाले.  

समतोल फाउंडेशन चे अध्यक्ष विजय जाधव यांच्या मार्गद्शनाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. एसटी कर्मचा्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

यापूर्वी आ. केळकर यांनी या फाउंडेशनच्या माध्यमातून सिव्हिल रुग्णालयातील कर्मचारी, परिचारिका, डॉक्टर यांच्या करिता जेवणाची तसेच एनर्जी ड्रिंकची व्यवस्था केली असून हायवेवरील ट्रक चालकांसाठी ही या संस्थेच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था केली आहे. 

यावेळी खोपट एस टी बस स्थानकाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.  

 411 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.