भिवंडीत गोदामाला भीषण आग

जिवीतहानी नाही 

भिवंडी – भिवंडी  येथील मानकोली भागात शुक्रवारी सकाळी एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. गोदामातील कामगार तात्काळ बाहेर पडल्याने मोठी जिवीतहानी टळली. सकाळपासून अंगांग वीजवण्यासाठी शर्थीचे प्रयन्त चालू होत दुपारी ३ वाजेच्या सुमारास आग विझविण्यास अग्निशमन दलाच्या पथकांना यश आले. आगीचे कारण अद्यााप अस्पष्ट असल्याची माहिती माहिती नारपोली पोलिसांनी दिली.
मानकोली येथील हरिहर कंपाऊंड परिसरात हरीश बॅकेट हे गोदाम आहे. या गोदामात रंगकामासाठी वापरण्यात येणारे ब्रश तयार केले जातात. शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास या गोदामाला अचानक आग लागली. त्यावेळी गोदामात सुमारे १० कामगार होते. त्यांनी तात्काळ गोदामातून बाहेर पळ काढला. ही आग इतकी भीषण होती की, धुराचे लोट परिसरात पसरले होते. आगीची माहिती मिळाल्यानंतर भिवंडी, कल्याण आणि ठाणे अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल झाली. दुपारी ३ वाजेच्या सुमारास येथील आग विझविण्यात अग्निशमन दलांना यश आले. याप्रकरणाची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.  

 348 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.