ग्रामीण भागात ‘दवंडी’ च्या माध्यमातून कोरोनाच्या उपाययोजनाबाबत जनजागृती

बोलीभाषेतून जनजागृतीवर भर

कोरोनाची दवंडी  जनजागृतीचे प्रभावी माध्यम

ठाणे – कोरोना संसर्गाचा अटकाव करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून क्षेत्रीयस्तरावर प्रत्येक्ष प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असतानाच जिल्हा परिषदेने विविध माध्यमांचा वापर करून नागरिकांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. यासाठी स्थानिक  बोली भाषा  तसेच प्रमाण भाषेचा वापर करून नागरिकांना आवाहन करणारी  ‘दवंडी’ कोरोना जनजागृतीचे प्रमुख आकर्षण  बनली आहे .

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या प्रेरणेतून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाकरिता जनजागृती केली जात असून ही दवंडी जिल्हा परिषद शिक्षक प्रमोद पाटोळे, अलंकार वारघडे, अजय पाटील, सुनिल पाटील यांच्या सहकार्यतून बनविण्यात आली आहे. ग्रामीण भागात विविध बोलीभाषा बोलल्या जातात. या बोलीभाषेतून जनजागृती करून नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगितल्या जात आहेत. याचबरोबर  ग्राफिक्स , व्हिडिओ,  ॲनिमेशन , लघुपट , स्टेटस व्हिडिओ , कविता , लेख , घोषवाक्य , चारोळ्या ,   इत्यादी  साहित्य निर्मिती करून जनजागृती केलीं जात आहे.यासाठी जनसंपर्क  कक्षाच्या।माध्यमातून प्रयोगशील शिक्षकांची टीम तयार करण्यात आली आहे. त्यांना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन) अजिंक्य पवार, शिक्षणाधिकारी संतोष भोसले यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

 543 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.