लसीकरण मोहिम जलद व सुरळीत होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक

18 ते 44 वयोगटाला नोंदणीसाठी दोन सत्रात स्लॉट उपलब्ध

ठाणे  –  ठाणे महापालिका क्षेत्रात लसीकरण मोहिम प्रभावी व जलदगतीने व्हावी यासाठी मुंबईच्या धर्तीवर खाजगी रुग्णालयांच्या माध्यमातून गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये लसीकरण करण्याबाबत धोरण निश्च‍ित करणे. तसेच 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन ड्राईव्ह इन लसीकरण मोहिम तर 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सकाळी 9 व संध्याकाळी 5 अशा दोन सत्रात स्लॉट उपलब्ध करुन देण्याबाबतचा निर्णय आज झालेल्या बैठकीत महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला.

महापालिका क्षेत्रातील लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी आज आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती. या बैठकीस उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, स्थायी समिती सभापती संजय भोईर, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला, भारतीय काँग्रेस पक्षाचे गटनेते दिपाली भगत, भाजपा गटनेते मनोहर डुंबरे, नगरसेवक विक्रांत चव्हाण, अतिरिक्त आयुक्त 1 गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चारुदत्त शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजयंती देवगीकर, डॉ. खुशबू टावरी, डॉ. अदिती पवार आदी उपस्थित होते.

सद्यस्थ‍ितीत ठाणे शहरात ज्या प्रमाणात लसी उपलब्ध होत आहेत, त्या प्रमाणात सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू आहे. तसेच 18 ते 44 या गटातील नागरिकांना ऑनलाईन नोंदणी सक्तीची असून या नागरिकांना स्लॉट उपलब्ध व्हावा यासाठी सकाळी 9 वा. व सायंकाळी 5.00 वा स्लॉट उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, यामुळे जास्तीत जास्त ठाणेकर नागरिकांना नोंदणी करणे शक्य होईल. तसेच मुंबईच्या धर्तीवर शासनाच्या मार्गदर्शक तत्वावनुसार गृहसंकुलांतील नागरिकांना खाजगी रुग्णालयाशी संलग्न होवून लसीकरणासाठी मान्यता देण्याबाबत धोरण निश्च‍ित करणे, तसेच 60 वर्षापुढील नागरिकांसाठी ड्राईव्ह इन लसीकरण धोरण ठरवून मध्यवर्ती जागा निश्च‍ित करणे याबाबतची नियमावली तयार करण्याबाबतचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 45 व त्या पुढील नागरिकांना देखील पहिल्या व दुसऱ्या डोससाठी नोंदणी करणे बंधनकारक आहे, परंतु झोपडपट्टी विभागातील नागरिकांसाठी काही केंद्रावर ऑफलाईन लसीकरण सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतही  निर्णय घेण्यात आला.

कोविड 19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता कमीत कमी कालावधीमध्ये सर्व नागरिकांना लसीकरण करणे आवश्यक असल्याने आगामी काळात लसींच्या उपलब्धतेनुसार वाढीव केंद्राबाबतही नियोजन करण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी असेही या बैठकीत ठरविण्यात आले.

 317 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.