अनाधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करा – संजय घाडीगांवकर

    ठाणे – ठाणे शहरात दिवसेंदिवस उभ्या राहणाऱ्या अनधिकृत बांधकामांविरोधात आवाज उठवित आहे. तसेच काही दक्ष नागरिकांनी वारंवार पुराव्यानिशी तक्रार करूनही ठाण्यातील वाढत्या अनधिकृत बांधकामांवर  कोणतीच कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या अनधिकृत बांधकामांकडे डोळेझाक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सेवेतून बडतर्फची कारवाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी ठाणे काँग्रेसचे नेते संजय घाडीगांवकर यांनी केली आहे.
     ठाणे शहरात अनधिकृत बांधकामे वाढत असताना उच्च न्यायालयात उपआयुक्त अशोक बुरफुले यांनी दिलेले शपथपत्र  म्हणजे उच्च न्यायालयाची दिशाभूल व फसवणूक करणारे आहे. तक्रारी पुराव्यानिशी येवून देखील कारवाई न करणारे महापालिका आयुक्त डॉ. शर्मा धुतराष्ट्राच्या भूमिकेत वा राजकीय दबावाखाली आहेत का? असा सवाल घाडीगांवकर यांनी केला आहे. पुरावे येवून पण सबंधित उपआयुक्त अशोक बुरफुले या सबंधित सहायक आयुक्त कोणावरही कारवाई नाही, हे दुर्दैव असून भ्रष्ट अधिकारी ठाणे शहराचा चेहरा विद्रुप करत असून त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे असेही घाडीगांवकर यांनी म्हटले आहे. तसेच भिवंडी येथील अनअधिकृत इमारतींवर दोन दिवसांपूर्वी माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई होऊन शेकडो कुटुंब रस्त्यावर आलेली आहेत, पाच सहा महिन्यात तयार होणाऱ्या अन अधिकृत इमारती मुळे मुंब्रा येथील  लकी कंपाऊंड इमारत दुर्घटना मध्ये 110 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता त्याची पुनरावृत्ती नको. शासकीय व खाजगी भूखंडावर चालू असलेले अन अधिकृत इमारती चे बांधकाम तत्कालीन आयुक्त टी चंद्रशेखर व आर ए राजीव यांच्या केलेल्या कारवाई प्रमाणे पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात यावे अशी मागणी संजय घाडीगांवकर यांनी केली आहे.

 541 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.