ठाण्यात हेवीवेट पुढाऱ्यांकडुन होणारा लसींचा गोलमाल रोखा – आ. संजय केळकर

ठाणे – ठाण्यात बेड,इंजेक्शननंतर आता हेवीवेट पुढाऱ्यांकडुन लसीचा गोलमाल सुरू झाला आहे.ठाणे महापालिकेच्या बहुतांश आरोग्य केंद्रावर काही बड्या पुढाऱ्यांच्या हस्तकांवरवी यंत्रणेवर दबाव आणला जात असुन टोकन न घेताच केंद्रातील लसीच्या साठ्यावर परस्पर डल्ला मारला जात असल्याचा धक्कादायक आरोप ठाण्याचे आमदार संजय केळकर यानी केला आहे.तसेच,या पुढाऱ्यांना रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
  ठाणे महापालिकेच्या लसीकरण मोहीमेत सुरु असलेल्या अनागोंदीचे पडसाद काही दिवसांपुर्वी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले होते. काही सत्ताधारी मंडळी आपल्या हस्तकांकरवी ठाणे महापालिकेच्या केंद्रात लसींचा साठा आपआपल्या प्रभागातील नागरिकांना देण्यास केंद्र संचालकाना भाग पाडत असल्याचे आरोप याच बैठकीत झाले होते.त्यानंतर पालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात देखील पुढाऱ्यांमार्फत आलेल्या वशिलेबाजांना व्हीआयपी कक्षात विनाटोकन लसीकरण सुरु असल्याची बाब भाजपने समोर आणली होती.या पार्श्वभुमीवर आमदार संजय केळकर यांनी,लसीकरणात गोलमाल सुरु असल्याचे म्हटले असुन काही हेवीवेट पुढाऱ्यांकडुन लसीकरणात सुरु असलेला हस्तक्षेप रोखण्याच्या सुचना प्रशासनाला केल्या आहे
 एकीकडे सर्वसामान्य नागरीक रांगेत उभे राहुन लस घेत असताना काही नेतेमंडळी घुसखोरी करून टोकनशिवाय आपआपल्या परिचितांना लसींचा फायदा मिळवुन देण्यास पुढाकार घेत आहेत.एखाद्या केंद्रात १०० लसींचा साठा आला तर,पुढारी मंडळी त्यातील ५० लसी स्वतःसाठी राखुन ठेवण्यास केंद्र संचालकांना धमकावतात.त्यामुळे टोकन घेऊन रांगेत उभे राहिलेल्या नागरीकांना नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे.तेव्हा,प्रशासनाने याची तत्काळ दखल घेऊन कारवाई करण्याच्या सुचना केळकर यांनी केल्या आहेत.

 283 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.