कोरोना ही लाट नसून साथीचा रोग – ठाणे काँग्रेस

ठाणे – एकवेळ ठाण्यातील सर्व विकासकामे आणि स्मार्ट सिटीची कामे बाजूला ठेवून आंध्र प्रदेश सरकारने जाहीर केल्याप्रमाणेच ठाण्यातील कोरोनाबाधित रूग्णाना ठाणे महापालिकेने मोफत उपचार करावेत अशी मागणी ठाणे शहर काँग्रेसने गुरुवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत केली. तसेच कोरोना ही लाट नसून साथी सारखा रोग आहे असे स्पष्ट करत नाकाने कांदे सोलण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच काँग्रेसची वरील मागणी म्हणजे तेल गेले तूप गेले आणि हाती आले धुपाटने या प्रमाणे आहे.अशीच चर्चा आता ठाण्यात रंगू लागली आहे.
             मागील वर्षांपासून कोविडच्या नावाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे रूग्णाच्या जिवनाचा खेळखडोबा चालू आहे साहीत्य खरेदी,हाॅस्पिटल उभारणी,औषध खरेदी,जेवणाची व्यवस्था या सर्वच गोष्टीमध्ये कोट्यावधी रूपयांचा मोठा भ्रष्टाचार चालू असून यात महापालिकेतील अधिकारी व सत्तारूढ पक्ष सहभागी असल्याचा आरोप ठाणे शहराध्यक्ष अँड.विक्रांत चव्हाण यांनी करत या भ्रष्टाचाराची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.अन्यथा काँग्रेसला आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल असे त्यांनी सांगितले.
           कोरोना हि लाट नसून साथी सारखा रोग आहे या करिता ब्रिटिश काळात एक कायदा करण्यात आला होता एखाद्या साथीवर कसे नियंत्रण मिळवायचे त्या साठी काय काय उपाय योजना करायच्यात याची संपूर्ण माहीती असताना एप्रिल २०१९ मध्ये हायकोर्टाच्या निकाल असतानाही ठाण्यातील अनधिकृत,निकष न पूर्ण करणारे सर्व हाॅस्पिटल्सवर कारवाई अथवा बंद करण्यात आले नाहीत यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.एकीकडे कोरोनाबाधित उपाय योजनाकरिता पैसा नाही असे सांगताना आयुक्तांच्या बंगल्याचे कामासाठी मात्र पैसा कसा आला आहे ?असा सवाल त्यांनी याप्रसंगी केला. वेंदात व प्राईम हाॅस्पिटल मधील झालेल्या दुर्घटनेत जबाबदार असणारे अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील त्यांनी याप्रसंगी केली.
              प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की,लसीकरण वा इतर उपाययोजना बाबत केंद्र व राज्य सरकारमध्ये समन्वय साधने गरजेचे आहे.आजही अनेक खाजगी हाॅस्पिटलमध्ये सरकारने निश्चित केल्या दरानुसार बीले घेत नसल्याच्या तक्रारी आढळून येत अशा हाॅस्पिटलवर काँग्रेसच्या माध्यमातून हल्लाबोल करण्यात येईल असा इशारा त्यांनी बोलून दाखवला आहे.
या पत्रकार परिषदेत ठाणे शहराध्यक्ष अँड.विक्रांत चव्हाण प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मनोज शिंदे,ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे, सुखदेव घोलप, रमेश इंदिसे,गिरिश कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 319 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.