करोनाच्या प्रादुर्भावात अन्नछत्र

४०० लोकांची जेवणाची व्यवस्था.

करोना रूग्ण, स्मशाभूमीतील कर्मचारी, रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना मदतीचा हात

ठाणे – सध्याच्या करोना काळात अनेकांना ऑक्सिजन, बेड, इंजेक्शन अशा प्राथमिक सुविधांसाठी झगडावे लागत आहे. त्यांची होणारी धावपळ, जीव वाचविण्यासाठी होणारी घालमेल, दिवसभर करावी लागणारी वणवण यामुळे दोन वेळच्या जेवणांचीही अनेकांची भ्रांत होत आहे. तर वाढत्या रूग्णांमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनाही उसंती मिळत नसल्याची परिस्थिती आहे. अशांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी श्यामलाल नायर चारिटेबल ट्रस्ट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधीचे शहराध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांच्या विद्यमानाने ठाण्यातील करोना पॉझिटिव्ह रूग्ण, त्यांचे नातेवाईक, लसीकरण केंद्र तसेच अँटीजन टेस्टिंग केंद्र, अंगणवाडी सेविका, स्मशानभूमीतील कर्मचारी अशा ४०० लोकांची जेवणाची मोफत सुविधा करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.
ठाण्यातील रूग्ण करोना पॉझिटीव्ह आल्यावर उपचारासाठी रूग्णालयात दाखल होतात, तर काही नातेवाईक विलगीकरण कक्षात उपचार घेत आहेत. अशा कुटूंबियांना जेवणाची समस्या येऊ नये, यासाठी श्यामलाल नायर चारिटेबल ट्रस्ट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधीने मदतीचा हात पुढ केला आहे. याचबरोबर अंत्यसंस्कारासाठी असलेल्या जवाहर बाग स्मशानभूमी तसेच कळवातील मनिषानगर परिसरात असलेल्या स्मशानभूमीमधील कर्मचाऱ्यांना गेल्या दहा दिवसापासून जेवणाची सोय करून देण्यात येत आहे.  याशिवाय ठाण्यातील लसीकरण केंद्रावर येणाऱ्या लोकांना देखील पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आजच्या घडीला करोनाच्या पार्श्वभूमीवर जिथे डॉक्टर्स, परिचारिका, स्मशानभूमीतील कर्मचारी तसेच इतर फ्रंटलाइन वर्कर्स स्वत:चा जीव धोक्यात घालून रूग्णांचा जीव वाचविण्यासाठी धडपडत आहेत. अशा पालिका कर्मचाऱ्यांनाचा विचार मात्र पालिकेने केलेला नाही. केवळ विलगीकरण कक्षामध्येच जेवणाची सुविधा महापालिकेच्या वतीने करून देण्यात आली असून अहोरात्र इतर ठिकाणी काम करणाऱ्यांचा मात्र विचार करायला प्रशासन विसरली आहे.
या सामाजिक कार्याच्या माध्यमातून अधिकाधिक गरजू लोकांपर्यंत पोहचण्या प्रयत्न करत असून जर कोणात्याही पॉझिटीव्ह किंवा विलगीकरण असलेल्या व्यक्तीला जेवणाची सुविधा आवश्यक असल्यास त्यांनी ९८९२०९०८४७  यावर संपर्क साधावा. आवश्यक त्या व्यक्तींना घरपोच मोफत जेवणाची सुविधा करून  दिली जाईल असे महिंद्रकर यांनी सांगितले.

 363 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.