महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ठाणे जिल्हाध्यक्ष, विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांचा मुजोर कर्मचार्याला ‘प्रसाद’
ठाणे – कोरोनाबाधित थकबाकीदाराच्या कुटूंबियांना घरातून उचलून नेण्याची भाषा करणार्या मेन्टीफी फायनान्स कंपनीच्या मुजोर कर्मचाऱ्याला मनसेने ठोकले. कोरोना काळात गोरगरिबांना थकित देणींसाठी धमक्या देणाऱ्या सर्व कंपन्यांना पाचंगे यांनी दिला इशारा. पुन्हा अशी चूक केल्यास असाच मनसे स्टाईल दणका दिला जाईल, हा सज्जड दम भरत पीडित पांचाळ कुटूंबियांची मेन्टीफी फायनान्समध्ये काम करणारा वसुली अधिकारी राज शुक्लाला पाया पडून माफी मागण्यास भाग पाडले. यावेळी मनविसे उपशहराध्यक्ष संदीप चव्हाण, विभाग सचिव मयूर तळेकर, विभाग अध्यक्ष विवेक भंडारे, उपविभागाध्यक्ष सागर वर्तक, मंदार पाष्टे, शाखाध्यक्ष ऋषिकेश घुले, कुश मांजरेकर ऋषिकेश सावंत, रोहित परब आदी उपस्थित होते.
475 total views, 2 views today