महाराष्ट्र दिनानिमित्त शिवसेना प्रभाग क्र १९च्या वतीने रक्तदान व प्लाझ्मा पूर्व चाचणी शिबिराचे आयोजन

ठाणे – शिवसेना प्रभाग क्र १९ यांच्या वतीने व नगरसेवक विकास रेपाळे व वृक्षप्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले – जाधव यांच्या पुढाकाराने रक्तदान व प्लाझ्मा पूर्व चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

ठाणे शहरात तसेच जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे . रुग्णांना जीवनदान द्यायचे असेल तर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान आणि प्लाज़्मादानासारख्या राष्ट्रकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन नगरसेवक विकास रेपाळे व वृक्षप्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले – जाधव यांनी केले.त्यानुसार शिवसेना प्रभाग क्र १९ यांच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ठाण्यातील कशिश पार्क क्लब हाऊस येथे रक्तदान व प्लाझ्मा पूर्व चाचणी शिबिराचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते.यावेळी सरकारने कोरोनाबाबत दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.

गेले काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने महाराष्ट्रात सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत आहे तसेच कोरोनाबाधित रुग्नांना प्लाझ्माची गरज भासत आहे हि बाबा लक्षात घेऊन नगरसेवक विकास रेपाळे व वृक्षप्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले – जाधव यांच्या पुढाकाराने शिवसेना प्रभाग क्र १९च्या वतीने आयोजित केलेल्या या शिबीराला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन याठिकाणी रक्तदान केले. तसेच कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा देण्यासाठी पूर्व चाचणी शिबीर देखील आयोजित केले होते याला देखील चांगला प्रतिसाद मिळाला.यामध्ये अनेकांनी प्लाझ्मा देण्यासाठी आपल्या नावांची नोंद केली.रक्तदान शिबिरात ७५ जणांनी रक्तदान केले तर २६ जणांनी प्लाझ्मा दानाची पूर्व चाचणी केली आहे. या शिबिरासाठी लोकमान्य टिसा ब्लड बँक यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबीर यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते,महिला आघाडी,युवासेना,भाविसेना कार्यकर्ते यांची परिश्रम घेतले.

 356 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.