नौपाड्यातील गरजू, गरीब कुटुंबांना महात्मा फुले जन आरोग्य कार्डची भेट

भाजपा, विश्वास संस्थेचा उपक्रम, घरेलू कामगारांची नोंदणीही सुरू

ठाणे – कोरोना आपत्तीच्या काळात आर्थिक उत्पन्न बेताचे असलेल्या नौपाड्यातील शेकडो कुटुंबांना महाराष्ट्र दिनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य कार्डची भेट मिळाली आहे. भाजपा व विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने गरजू कुटुंबांची नोंदणी करून गंभीर आजारांवर मोफत उपचारांचा मार्ग खुला केला. भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले व कु. वृषाली वाघुले यांनी हा उपक्रम राबविला.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ९७१ गंभीर आजार व १२१ पाठपुरावा सेवांवर खासगी व ट्रस्टच्या हॉस्पिटलमधून मोफत उपचार केले जातात. या उपचारांची रक्कम सरकारकडून भरली जाते. नौपाड्यातील बहूसंख्य गरजू व गरीब कुटुंबांना सुकर व मोफत उपचार करण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले व विश्वास सामाजिक संस्थेने नागरिकांना जन आरोग्य योजनेचे लाभ देण्याचे ठरविले होते. त्यानुसार नोंदणी करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कोरोना नियमावली पाळत कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन कार्डचे वाटप केले. या कार्डमुळे शेकडो नागरिकांना मोफत उपचाराचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामात भाजयुमोचे नौपाडा मंडल अध्यक्ष प्रशांत कळंबटे यांनीही सहकार्य केले.

यश आनंद सोसायटी परिसरात राजेश ठाकरे, शैलेंद्र देसले, प्रकाश जांभळे, मुन्नरशेठ चाळ तबेला परिसरात मनोज शुक्ला, अतुल मिश्रा, श्री. वर्माजी, गावदेवी-न्यू प्रभात नगर परिसरात संतोष दाईटकर, मंत्री प्लॉट परिसरात प्रथमेश कदम, रामदास पवार, दादा पाटीलवाडी परिसरात सुनील साठ्ये, बाळकृष्ण शिंपी यांनी कार्डचे वाटप केले.

 269 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.