डहाणू नगरपरिषद करीता स्वतंत्र पदभार असलेले मुख्याधिकारी द्या – आमदार विनोद निकोले नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

डहाणू. – डहाणू नगरपरिषद करीता स्वतंत्र पदभार असलेले मुख्याधिकारी द्या असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ई-मेल द्वारे निवेदन पाठवून मागणी केली आहे.

आमदार कॉ. निकोले म्हणाले की, डहाणू हा पालघर जिल्हयातील एक आदिवासी बहुल तालुका आहे. तसेच डहाणू तालुका हा मुख्यत्वे डोंगरी व सागरी भागात वसलेला आहे. त्यात डहाणू शहर असल्याने या ठिकाणी नगर परिषद आहे. डहाणू नगर परिषदे चे कामकाज सुरूच आहे. पण, गेल्या महिन्यात मुख्याधिकारी स्व. अतुल पिंपळे यांचे आकस्मित निधन झाल्यामुळे त्यांचा पदभार तलासरी मुख्याधिकारी यांच्या कडे सोपविण्यात आले होते. पण, तलासरी ते डहाणू साधारण अंतर हे ४५ ते ५० कि.मी आहे. त्यामुळे कामकाज होणे गैरसोय होत होते. तद्नंतर, डहाणू नगर परिषद चे कारभार डहाणू तहसीलदार यांच्या कडे सोपविण्यात आले आहे. पण, डहाणू हे शहर आहे. या शहरात दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत असून नागरिकांच्या समस्या सुद्धा वाढत आहेत. त्याचबरोबर आता कोरोना कोविड – १९ प्रादुर्भाव डहाणू मध्ये पसरत आहे. त्यामुळे शहरात आरोग्य सुविधा देत असताना अडचणी चे होत आहे. ज्याअर्थी नगर परिषदेकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या प्राथमिक सेवा गरजेचे आहे. त्यानुसार डहाणू शहरात सांडपाण्याची व्यवस्था करणे, जन्ममृत्युची नोंद ठेवणे, आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देणे अडचणी चे होत आहे. त्या बाबत च्या तक्रारी सतत गेल्या महिन्याभरापासून माझ्या कडे येत आहे. त्या अनुषंगाने डहाणू नगर परिषद करीता स्वतंत्र पदभार आलेले मुख्याधिकारी असणे कोविड – १९ काळात अत्यंत आवश्यक झाले आहे. जेणे करून कोरोना संदर्भात उपयोजना करण्यास सोयीचे होईल. त्या अनुषंगाने तात्काळ डहाणू नगरपरिषद करीता स्वतंत्र पदभार आलेले मुख्याधिकारी राज्य शासनाकडून देण्यात यावे असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ई-मेल द्वारे निवेदन पाठवून मागणी केली आहे.

यावेळी माकप जिल्हा कमिटी सदस्य कॉ. चंद्रकांत गोरखना, डहाणू शहर सचिव कॉ. धनेश अक्रे, कॉ. रशीद पेंटर, कॉ. महेंद्र दवणे, डॉ. आदित्य अहिरे आदी उपस्थित होते.

 410 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.