खाल्लेल्या फळांच्या बिया कचऱ्यात फेकू नका

सेव्ह द अर्थ फाऊंडेशन’ चे आवाहन
वसई – खाल्लेल्या प्रत्येक फळाची आंबा, फणस, जांभूळ, कलिंगड, टरबूज, बोर वा इतर कोणत्याही फळाची प्रत्येक बी जपून ठेवा, असे आवाहन ‘सेव्ह द अर्थ फाऊंडेशन ‘ या वसईतील संस्थेने केले. संस्थैच्या माध्यमातून जून महिन्यात या बिया तुमच्याकडून जमा केल्या जातील. पावसाळ्यात या बियांचा वापर जंगलात नेऊन केला जाणार असल्याचे सांगितले आहे. या बियातून जेणे करून नवीन झाडाची निर्मिती होणार आहे. सेव्ह द अर्थ फाऊंडेशन’ वसई ही पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणारी संस्था आहे. यासाठी संस्थेतर्फे विविध उपक्रम चालविले जातात.
सध्या संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समेस्येला उत्तर द्यायचे असेल तर आपण आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. वीज व पाण्याची बचत, टाकाऊ वस्तूचा पुनर्वापर या सारख्या छोट्या छोट्या गोष्टीमधून समृद्ध पर्यावरण आपण निर्माण करू शकतो. फळांच्या बिया जपून ठेवून त्या पुन्हा जंगलात टाकणे ही सुद्धा अशीच एक छोटीशी गोष्ट आहे. अशा या छोट्या कृतीमुळे भावी पिढ्यांसाठी आपण जंगल राखून ठेवू शकणार आहोत. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे गट, महिला मंडळे, गृह संस्था यांनी उपक्रमात सहभागी होऊन पुढील महिनाभर विविध प्रकारच्या बियांचे एकत्र संकलन करून ठेवावे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण संस्थेला 9370269688 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यास संस्थेचे कार्यकर्ते आपल्याकडून बिया घेऊन जातील. सदर उपक्रमास लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा असेही ‘सेव्ह द अर्थ फाऊंडेशन’ तर्फे आवाहन करण्यात आले आहे.

 83 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *