रिकामी थाळी वाजवण्यापेक्षा अन्नाने भरलेली शिवभोजन थाळी शिवसेना देते

शिवसेनेचा भाजपाला टोला

डोंबिवली : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ एप्रिल पर्यत लॉकडाऊन जाहीर केले आहे.मात्र लॉकडाऊन मध्ये गरिब उपाशी राहू नये म्हणून ठाकरे मुख्यमंत्री यांनी शिवसेनेकडून मोफत थाळी देण्याचा निर्णय घेतला.आतापर्यत राज्यातील १५ लाखापेक्षा जास्त नागरिकांना शिवभोजन थाळी देण्यात आली आहे.मात्र तरीही भाजप शिवसेनेवर टीका करत शिवभोजन थाळी कुठे मिळते अशी सोशल मिडीयावर विचारला जात होता.यावर रिकामी थाळी वाजवण्यापेक्षा अन्नाने भरलेली शिवसेना शिवभोजन थाळी देतो अशा टोला शिवसेनेचे भाजपाला टोला लगावला.डोंबिवली पूर्वेकडील शिवसेना मध्यवर्ती शाखेत गरिबांना मोफत शिवभोजन थाळी देण्यात आली. यावेळी डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश कदम यांनी भाजपाचे नाव घेता उत्तर दिले.
१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त गरीब आणि गरजूंसाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे,आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेत गरिबांना शिवभोजन थाळी देण्यात आली.यावेळी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवली शहप्रमुख राजेश मोरे, डोंबिवली विधानसभा संघटक तात्या माने, राजेश कदम,डोंबिवली पश्चिम शहर संघटक किरण मोंडकर, कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक कविता गावंड, उपशहरप्रमुख संतोष चव्हाण,उपशहरप्रमुख किशोर मानकामे,परिवहन सभापती माजी सुधीर पाटील,कार्यक्रम प्रमुख सतिश मोडक, उपशहर संघटक राम मिराशी, दिपक भोसले सागर जेधे,प्रथमेश खरात,कैलास सणस आदि उपस्थित होते. यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे म्हणाले,लॉकडाऊनपर्यत दररोज ५०० जणांना शिवभोजन थाळ्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.तर शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे म्हणाले, ठाकरे सरकार जनतेसाठी काम करत आहे. या सरकारला गरीब जनतेच्या पोटाची चिंता आहे. म्हणूनच मोफत शिवसेना गरिबांना शिवभोजन थाळी दिली जाते.इतरांसारखे रिकामी थाळी वाजवायला सांगत नाही.तर कविता गावंड यांनी डोंबिवलीत शिवभोजन थाळी उपक्रमामुळे दोन महिला बचत गटांना रोजगार मिळाल्याचे सांगितले.

 334 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.