एनआरबी शाळेत शिवजंयती उत्साहात

संस्थेचे अध्यक्ष नामदेव भगत यांनी शिवकार्याचा आढावा घेताना शिवकार्यातून प्रत्येकाने प्रेरणा घेवून आपल्या जीवनात वाटचाल केली तरच शिवजंयती उत्सव सार्थकी लागणार असल्याचे सांगितले.

नवी मुंबई : नेरूळमध्ये एनआरबी शैक्षणिक संस्थेच्या मराठी, इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये तसेच महाविद्यालयामध्ये शिवजंयती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेच्या प्रागंणात संस्थेचेअध्यक्ष , सिडकोचे माजी संचालक व शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नामदेव भगत यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व शिवप्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी नवी मुंबई मनपा परिवहन समितीचे माजी सदस्य व शिवसेना उपशहरप्रमुख किशोर पाटील, शाळेतील व महाविद्यालयतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, नेरूळ गावचे ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
यावेळी नामदेव भगत यांनी आपल्या भाषणातून शिवकार्याचा आढावा घेताना शिवकार्यातून प्रत्येकाने प्रेरणा घेवून आपल्या जीवनात वाटचाल केली तरच शिवजंयती उत्सव सार्थकी लागणार असल्याचे सांगितले. शिवरायांना जीवाला जीव देणारे मावळे भेटले, शिवरायांवर त्यांनी केवळ प्रेमच केले नाही तर आपले आयुष्यही समर्पित केले. आज समाजातील अपप्रवृत्तींवर मात करायची असेल तर समाजकार्य करणाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून या स्वराज्यात सुराज्य घडविण्यासाठी सर्व चांगल्या विचारांच्या लोकांनी एकत्रित यावे असे आवाहन नामदेव भगत यांनी यावेळी केले. आपल्या भाषणातून त्यांनी कोरोना महामारीचाही उल्लेख करताना एकमेकांची काळजी घेणे, मदत करणे, रूग्णालयीन प्रवेशाकरता सहकार्य करणे, पथ्य पाळणे आदी सूचनाही उपस्थितांना केल्या.

 346 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.