स्पीडच्या विजयात हर्षा,भरत चमकले


अंतिम फेरीत स्पीड विरुद्ध सीजीएसटी असा रंगणार सामना

ठाणे : भरत मेहेर आणि हर्षा पाटीलच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर स्पीड क्रिकेट क्लबने युनियन क्रिकेट क्लबचा ३ विकेट्सनी पराभव करत ज्ञानराज स्पोर्ट्स आयोजित मर्यादित ४० षटकांच्या लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. अंतिम फेरीत स्पीड क्रिकेट क्लबसमोर सीजीएसटी संघाचे आव्हान असेल. अर्धशतकी खेळी करणाऱ्या हर्षा पाटीलला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
भिवंडीतील सोनाळे मैदानावर खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात युनियन क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करताना ४० षटकात ९ बाद १९९ धावा अशी मजल मारली. संघाला द्विशतकी धावांच्या उंबरठ्यावर नेताना शाश्वत जगतापने ७३ धावांची तडाखेबंद खेळी केली. किशन पांडेने ३८ आणि रोहित खोतने ३१ धावांचे योगदान दिले. स्पीड संघाच्या तौफिक शेख आणि विहंग खातूने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. विजयाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्पीड क्रिकेट क्लबने ३७ व्या षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात २०० धावा करत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. भरतने ४४ आणि हर्षााने ५४ धावा केल्या. पराभूत संघाच्या मित सहानीने ३ आणि साहिल शेट्टीने दोन फलंदाज बाद केले.

 621 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *