अफगाणिस्तानातील १० वर्षाच्या मुलावर जीवघेण्या आजारावर बोरिवलीतील एचसीजी कॅन्सर सेन्टर येथे यशस्वी उपचार

   

 पाकिस्तानात उपचार उपलब्ध नसल्यामुळे अफगाणिस्तानातील कुटुंबाची भारताकडे धाव
मुंबई :  गेल्या वर्षभरात कोरोना संक्रमणामुळे अनेक नागरिक भारतात उपचारासाठी येऊ शकले नाही तसेच अनेक रुग्णांना  भारतात उपचारासाठी येण्याची इच्छा असून त्यांना व्हिसासाठी लागणारी कागदांची पूर्तता, कोरोना संक्रमणामुळे करावे लागणारे विलीगकरण अशा समस्यांना तोंड  द्यावे लागत आहे परंतु भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने एका काबुल येथील दहा वर्षाच्या मुलाच्या दुर्मिळ आजारावर योग्य वेळी उपचार उपलब्ध झाले . काबुल अफगाणिस्तान येथे राहणाऱ्या रशिदवर (  नाव बदलेले आहे )  हेमोफॅगोसाइटिक लिम्फोहिस्टीयोसाइटोसिस या अत्यंत दुर्मिळ आजारावर बोरिवलीतील एचसीजी कॅन्सर सेन्टर इथे यशस्वी उपचार करून त्याला जीवनदान मिळाले  आहे. हेमोफॅगोसाइटिक लिम्फोहिस्टीयोसाइटोसिस  हा जीवघेणा सिन्ड्रोम (तापाचा प्रकार) असून यामध्ये प्रतिकारशक्ती कमी होत जाऊन  फक्त ५ टक्के वाचण्याची आशा असते व यासाठी  म्हणजे लोजेनिक हेमेटोपोएटिक स्टेम सेल प्रत्यारोपण करणे गरजेचे असते.  बोरिवली येथील एचसीजी कॅन्सर सेन्टरमध्ये  रशीदला  हेमोफागोसिटिक लिम्फोहिस्टीओटोसिटोसिस सिंड्रोमसह सादर केले तेंव्हा  मंक ( १३-१४)(यूएनसी १३ डी) जनुकातील उत्परिवर्तनांद्वारे टाइप ३ चे निदान झाले जे वैद्यकीय भाषेत प्राणघातक मानले जाते ज्यावेळी रशिद  बोरिवलीमध्ये आला त्यावेळी त्याला कमी ऐकू येत होते तसेच त्याच्या उजव्या डोळ्यामध्ये दृष्टी कमी झाली होती.
रशिदच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार रशिदला २०१८ मध्ये साधा ताप आला होता व  हळूहळू त्याची प्रतिकारशक्ती कमी होत गेली, २०१८ मध्ये त्याला पाकिस्तानमध्ये नेण्यात आले पंरतु तिथे डॉक्टरांना या आजाराचे निदान करता आले नाही , नंतर त्याला दुबईला नेण्यात आले कारण रशिदचे वडील दुबईत टॅक्सी ड्रायव्हरचे काम करतात दुबईच्या डॉक्टरांनी या आजाराचे निदान केले स्टेम सेल प्रत्यारोपणासाठी भारतामध्ये जाण्याचा सल्ला दिला. चार वर्षांपूर्वी रशिदच्या भावाचा याच आजाराने मृत्यू झाला होता. एचसीजी कॅन्सर सेन्टरचे डॉ. सूरज चिराणिया, हेमॅटोऑन्कोलॉजी आणि बीएमटी तज्ञ  यांच्या देखरेखीखाली रशीदचे उपचार सहा महिन्यापूर्वी सुरु झाले, कोरोना संक्रमण असल्यामुळे सुरुवातीला फक्त विडिओ कॉल मार्फत मार्गदर्शन सुरु होते, नंतर दोन्ही देशातील परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने राशिदला गेल्या महिन्यात भारतात आणले व त्याच्यावर स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले यामध्ये मेंदू व हृदयाचा संबंध असल्यामुळे ही शल्यचिकित्सा फारच जोखमीची समजली जाते. याविषयी अधिक माहिती देताना एचसीजी कॅन्सर सेन्टरचे डॉ. सूरज चिराणिया, हेमॅटो ऑन्कोलॉजी आणि बीएमटी तज्ञ म्हणाले, ” रशिदच्या कुटुंबीयांना या जोखमीच्या शल्यचिकित्सेची माहिती दिली कारण रशिदचा जंतुसंसर्ग झालेला बॉन मॅरो केमोथेरेपीच्या उपचाराने काढणे गरजेचे होते तसेच रशीदचे नशिब बलवत्तर होती कारण रशीद बरोबर त्याचा दुसरा भाऊ भारतात आला होता त्याचा बोने मॅरो जुळला गेला. अप्रेसिस या आधुनिक उपकरणाच्या मदतीने ऑपरेशन न करता स्टेम सेलचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. अनुवांशिक कारणामुळे हेमोफॅगोसाइटिक लिम्फोहिस्टीओटोसिस (एचएलएच) हा अत्यंत घातक आजार शरीरात निर्माण होतो. प्रत्यारोपणानंतरचा काळ हा रुग्णांसाठी कठीण समजला जातो कारण अशा प्रकारे प्रत्यारोपण केलेल्या  ४० टक्के रुग्णांना  गंभीर व्हेनो-अक्रुल्युव्ह लागण , कॅन्डिडा पॅरासिलोसिस सेप्सिस, स्टिरॉइड-रेफ्रेक्टरी ग्रेड चतुर्थ गटात जीव्हीएचडी सारख्या गुंतागुंतीच्या समस्या भविष्यात होऊ शकतात  तसेच  यकृत, मूत्रपिंड आणि फुफ्फुसात बिघाड होऊ शकतो त्यामुळे आम्ही परंतु अत्यंत काळजीपूर्वक व आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने  हे प्रत्यारोपण यशस्वीरित्या केले आहे, कारण कोणत्याही परिस्थितीत त्याचा जीव वाचविणे ही आमची प्राथमिकता होती.”
आमचा तीन वर्षांचा संघर्ष संपला असून मी माझ्या मुलाचे प्राण वाचवू शकलो हीच माझ्या मोठ्या मुलाला श्रद्धांजली आहे कारण माझ्या मोठ्या मुलाला मी वाचवू शकलो नाही तसेच माझी आर्थीक स्थिती खूपच खराब असल्यामुळे एचसीजी कॅन्सर सेन्टरचे डॉ. सूरज चिराणिया व त्यांच्या टीमने क्रावूड फंडिंग  म्हणजेच ऑनलाईन पैसे  जमविण्यासाठी मदत केली त्यामुळे आम्ही हे उपचार करू शकलो अशी भावना रशिदच्या वाडिलांनी बोलून दाखविली. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात रशिद काबूलला परतला असून गेले पंधरा  दिवस एचसीजी कॅन्सर सेन्टरचे डॉक्टर विडिओ कॉल व इंटरनेटच्या माध्यमातून लक्ष देत असून त्याची तब्येत आता सुधारत आहे.

 376 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.