ठाण्यात धावणार बाईक अ‍ॅम्ब्युलन्स

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कळवा-मुंब्रा मतदारसंघासाठी दिल्या ४ रुग्णवाहिका
ठाणे : सध्या ठाणे शहरात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यास तेथे रुग्णवाहिका पोहचण्यासाठी वेळ जातो. त्यावर तोडगा म्हणून कळवा- मुंब्रा विधानसभा मतदारसंघासाठी बाईक अॅम्ब्युलन्स देण्यात याव्यात, अशी मागणी  गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. त्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून कळवा-मुंब्रा मतदारसंघासाठी  चार बाईक अ‍ॅम्ब्युलन्स प्रदान करण्यात आल्या.
रुग्णवाहिका वाहतूक कोंडीमध्ये अडकत असल्याने रुग्णांना तत्काळ उपचार मिळत नाहीत. अपघातांच्या घटनांमध्ये तर अपघातग्रस्तांपर्यंत रुग्णवाहिका पोहचविणेच पोलिसांना जिकिरीचे होत असते. त्यामुळे दुचाकी रुग्णवाहिकेचा पर्याय पुढे आला आहे.  कळवा- मुंब्रा भागात अशा रुग्णवाहिका अत्यंत गरजेच्या असल्याने  डॉ. आव्हाड यांनी बाईक रूग्णवाहिकेची मागणी केली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही मागणी तत्काळ मान्य करून हिरो मोटर्स या  कंपनीने तयार केलेल्या  दुचाकी रुग्णवाहिका शुक्रवारी कळवा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात  या दुचाकी रुग्णवाहिका सामाजिक कार्यकर्त्या ॠता जितेंद्र आव्हाड यांच्याकडे   परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सुपूर्द केल्या.
यावेळी कळवा प्रभाग समिती अध्यक्षा वर्षा  मोरे, माजी विरोधी पक्ष नेता मिलिंद पाटील,माजी विरोधी पक्ष नेत्या श्रीमती प्रमिला केणी,  नगरसेवक  प्रकाश बर्डे , महेश साळवी,  नगरसेविका  अपर्णा साळवी , आरती गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष  विक्रम खामकर, सामाजिक न्याय विभागाचे ठाणे शहराध्यक्ष कैलास हावळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, कळवा मुंब्रा विधानसभा युवती अध्यक्षा पुजा शिंदे, सबिया मेमन, कल्पना नार्वेकर,  पल्लवी गीध,  मा. युवक अध्यक्ष मंदार केणी, कुणाल पाटील, निखिल तांबे, दिनेश बने, समीर अडकर, अभिषेक पुसाळकर, मिलिंद सिन्नरकर, तुळशीराम साळवे, विशाल खामकर,दिलीप उपाडे आदी उपस्थित होते.
अशी असणार बाईक अ‍ॅम्बुलन्स
हिरो कंपनीने ही बाईक अ‍ॅम्बुलन्स विकसीत केली आहे. या दुचाकीला साईड कार जोडण्यात आली आहे. या साईड कारमध्ये स्ट्रेचर बसविण्यात आले असून त्यावर एक रुग्ण आरामात झोपू शकतो. तर, या साईडकारवर छतही टाकण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णाला सावलीदेखील मिळणार आहे. या बाईक अ‍ॅम्बुलन्सचे स्ट्रेचर काढून रुग्णाला रुग्णालयात नेणे शक्य होणार आहे. शिवाय, या बाईक अ‍ॅम्बुलन्सवर चालकासह अन्य एकजण बसू शकणार आहे.

 577 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.