रोटरी कम्युनिटी कॉर्पसने केली नदीचा घाट आणि परिसर स्वच्छता

शहापुर तालुक्यातील कानवी नदीकिनारी किन्हवली नजीक असलेल्या चेरवली मठाच्या गणेश घाट,मठ व मंदिर परिसरात प्रचंड अस्वच्छता पसरली होती.

शहापूर (शामकांत पतंगराव) : किन्हवली नजीक असलेल्या चेरवली मठ व मंदिर परिसरातील नदी घाटावर झालेली अस्वच्छता व त्यातून येणारी दुर्गंधी या मुळे भाविकांचे आरोग्य बिघडू नये म्हणून येथील
रोटरी कम्युनिटी कॉर्पस, किन्हवली डायमंड या फ्रेंड्स ग्रुपने श्रमदान करून नदीचा घाट आणि परिसर स्वच्छता केली.
सामाजिक कार्याची आवड जोपासण्यासाठी किन्हवली आणि परिसरातील काही मित्रांनी एकत्र येऊन
रोटरी कम्युनिटी कॉर्पस किन्हवली डायमंड फ्रेंड्स ग्रुप स्थापन केला असून त्यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक प्रश्न हाताळून त्यांना न्याय मिळवून दिला आहे.सह्याद्रीच्या पर्वत रांगांतील आजोबा पर्वतावरील पाण्याच्या टाकीसाठी त्यांनी केलेल्या आवाहनाला अनेकांनी मदत केली असून तिथे थोड्याच दिवसांत शुद्ध पाण्याची सोय होणार आहे.
शहापुर तालुक्यातील कानवी नदीकिनारी किन्हवली नजीक असलेल्या चेरवली मठाच्या गणेश घाट,मठ व मंदिर परिसरात प्रचंड अस्वच्छता पसरली होती.
गणेश घाटावर महिला रोजच कपडे धूत असतात, पाण्यात पोहणारी मुले व मच्छीमारीसाठी मच्छीमारांची वर्दळ,मृत व्यक्तींच्या दशक्रियाविधी या मुळे गणेश घाटावर साचलेला गाळ,माती,दगड,धार्मिक विधी करत असतांना फेकून दिलेले साहित्य,फुटलेली मडकी,उगवेलेले गवत,वाढलेली झुडुपे आणि त्यामुळे साप,विंचवांची भिती अशा वातावरणामुळे भाविकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे असे लक्षात येताच
लोकोपयोगी असलेला हा घाट धार्मिक कार्यक्रमांसाठी पुन्हा सुरु होण्यासाठी स्वच्छता होणे गरजेचे होते.या साठी खरीड गावचे पोलीस पाटील यांच्या पुढाकाराने व
रोटरी कम्युनिटी कोर्पसने किन्हवली डायमंड या ग्रुपचे संजय गगे खरीडकर,रविंद्र हरड,रोटरी कम्युनिटी कॉर्पसने पोलीस पाटील राजेश ढमके ,गणेश विशे,राहुल वेखंडे व भिवाजी वेखंडे यांनी श्रमदानाने घाटावर साचलेल्या घनकच-याची योग्य विल्हेवाट लावली.अंगणाची झाडलोट केली आणि पुन्हा एकदा नदीचा घाट महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर भाविक भक्तांसाठी पूर्ववत सुरु करुन दिला.
हा अभिनव उपक्रम राबविणाऱ्या या मंडळाचे शहापूर तालुक्यात कौतूक होत आहे

 587 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.