सारसोळेच्या खाडीत बामणदेवाचा भंडारा उत्साहात संपन्न

महाशिवरात्रीच्या दिवशी दरवर्षी बामणदेवाचा भंडारा भाविकांच्या उत्स्फूर्त गर्दीत साजरा होत असतो.

नवी मुंबई : नवसाला पावणारा व भाविकांच्या हाकेला धावून जाणारा अशी नवी मुंबई, ठाणे-रायगड पट्टीत ख्याती असलेल्या बामणदेवाचा भंडारा सारसोळेच्या खाडीत उत्साहाने पार पडला. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजक असलेल्या सारसोळेच्या ग्रामस्थांकडून बामणदेवाचा भंडारा रद्द केलेला असतानाही दिवसभरात असंख्य भाविकांनी बामणदेवाचे दर्शन घेतले.
महाशिवरात्रीच्या दिवशी दरवर्षी बामणदेवाचा भंडारा भाविकांच्या उत्स्फूर्त गर्दीत साजरा होत असतो. यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भंडारा सारसोळे ग्रामस्थांकडून रद्द करण्यात आला होता. कोरोना पाहता भंडारा रद्द करण्यात आल्याचे फलकही पामबीच मार्गावर सारसोळे ग्रामस्थांकडून लावण्यातही आले होते. तरी दरवर्षीप्रमाणे सकाळपासून रात्री उशिरापर्यत बामणदेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची वर्दळ सुरूच होती. नवी मुंबईतील सामाजिक, धार्मिक, सहकार, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने बामणदेव मंदिराजवळ हजेरी लावली होती.
सिडकोचे माजी संचालक व शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नामदेव भगत, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, स्थायी समितीचे माजी सभापती संपत शेवाळे, महापालिकेतील माजी नगरसेवक सुरज पाटील, शिवसेना विभागप्रमुख व माजी नगरसेवक रतन मांडवे, माजी नगरसेविका सुजाता पाटील, जयश्री ठाकूर, मिरा पाटील, सुनिता मांडवे, समाजसेवक गणेश भगत, भाजयुमोच्या महिला जिल्हाध्यक्षा सुहासिनी नायडू, नवी मुंबई कॉंग्रेसचे जिल्हा सचिव गुरू म्हात्रे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुका अध्यक्ष महादेव पवार, कॉंग्रेसचे नेरूळ तालुका सचिव दिनेश गवळी, नेरूळ गावचे जयवंत पाटील, शिवसेना उपविभागप्रमुख प्रल्हाद पाटील, संकेत सरफरे, भाजपचे वॉर्ड अध्यक्ष विलास चव्हाण, समाजसेवक रवी भगत, अशोक गांडाळ, सागर मोहिते उपस्थित होते.

 304 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.