ठाणे शहर काँग्रेसतर्फे १०वी व १२वी च्या विद्यार्थ्यांकरिता सराव परिक्षा

 

या सराव परीक्षेकरिता विविध शैक्षणिक संस्था, ठा.म.पा.शाळा व काही क्लासेस चालविणा-या सस्थेचीही मदत घेण्यात आली असून ठाण्यातील प्रत्येक भागातील केंद्रावर या सराव परिक्षा घेण्यात येतील असे ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितले.

ठाणे : ठाणे शहर(जिल्हा)काँग्रेसच्या वतीने संपूर्ण ठाण्यातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता ठाण्यातील विविध भागातील केंद्रावर सराव परिक्षा १८ ते ३१ मार्च या कालावधीत घेण्यात येणार असल्याची माहिती ठाणे शहर काॅग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण यांनी दिली.
याप्रसंगी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की,कोरोना सारख्या महाभयंकर कालावधीत विद्यार्थी शिक्षणापासून दूर गेला सर्व शाळा या कालावधीत बंदच होत्या त्यामूळे विद्यार्थ्यांना आवश्यक असे शैक्षणिक मार्गदर्शन मिळाले नाही.सर्वच विद्यार्थ्यांनी शक्य होईल त्या मार्गाने अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे अशा सराव परिक्षामुळे त्यांना योग्य अशी दिशा मिळण्यास मदत होईल म्हणून या परिक्षा घेण्यात येत असल्याचे सांगितले,दहावीतील एस्.एस्.सी.,सी.बी.एस्.ई व आय्.सी.एस्.ई च्या विद्यार्थ्यी व बारावी चे विद्यार्थी या सराव परीक्षेचा लाभ घेऊ शकतात या सराव परीक्षेकरिता विविध शैक्षणिक संस्था, ठा.म.पा.शाळा व काही क्लासेस चालविणा-या सस्थेचीही मदत घेण्यात आली असून ठाण्यातील प्रत्येक भागातील केंद्रावर या सराव परिक्षा घेण्यात येतील असे सांगितले.अॅड विक्रांत चव्हाण यांनी पुढे बोलताना ठाण्यातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असून अजूनही १५ मार्चपर्यंत विद्यार्थ्यानी ९९८७५६२६३६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

 449 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.