“भारत ई मार्केट” मोबाईल अँपचे अनावरण

स्वदेशी अँप करणार परदेशी अँपचा मुकाबला

मुंबई : कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) व्यावसायिक स्पर्धेत परकीय कंपन्यांना टक्कर देण्यासाठी “भारत ई मार्केट” नावाच्या स्वदेशी अँपचे अनावरण केले आहे. भारत ई मार्केट हे एक क्रांतिकारक डिजिटल मॉडेल असून त्यात ऑफलाईन रिटेल आणि अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा संगम आहे. हा अँप पूर्णपणे व्यापाऱ्यांचा असून, व्यापाऱ्यांनी व्यापारी आणि ग्राहकांसाठी त्याची निर्मिती केली आहे.
कॅटचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी वेलफेयर महासंघाचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर म्हणाले, आर्थिक अंमलबजावणी संचालनालय आणि कॉम्पेटिशन कमिशन ऑफ इंडिया कडून परदेशी ई पोर्टल च्या कथित गैरकारभारविरुद्ध सुरु असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या अँपची निर्मिती करण्याचा महत्वाचा निर्णय कॅटने घेतला. कॅट ही भारतातील व्यापाऱ्यांची शिखर संघटना असून विविध ४०हजाराहून अधिक व्यापारी संघटनांच्या ८ कोटी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करते. कॅटचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रविण खंडेलवाल म्हणाले, भारत ई मार्केट अँप हा पूर्णपणे भारतीय आहे. परकीय, बहुराष्ट्रीय बड्या कपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी भारत ई मार्केट अँपमुळे भारतीय व्यापाऱ्यांना सन्मानजनक व्यासपीठ मिळणार आहे. या अँपच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना आपल्या अनेक वर्षांपासून असलेल्या पारंपरिक जुन्या ग्राहकांना डिजिटल माध्यमातून सेवा देण्याची संधी मिळणार आहे. आगामी३१ डिसेंबरपर्यत किमान सात लाख विक्रेते आणि ३१ डिसेंबर २०२३ पर्यत १ कोटी विक्रेत्यांना सामावून घेण्याचे लक्ष्य समोर ठेवण्यात आले आहे. भविष्यात चीनवर कुरघोडी करत ८० लाखाहून अधिक विक्रेत्यांचे जाळे असलेले जगातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र बनवण्याचा संकल्प केला आहे.

 545 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.