मास्क परिधान न केलेल्या ११३१ व्यक्तींवर कारवाई
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेञात कोरोना साथीच्या वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिका अनेकविध प्रयत्न सातत्याने करीत आहे, या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, महापालिकेच्या सर्व प्रभाग परिसरात सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्क वा कापड परिधान न करणा-या व्यक्तींविरुद्ध दंडाची कारवाई महापालिकेने जोमाने सुरु ठेवली आहे. १ मार्च ते १० मार्च या गेल्या दहा दिवसांत केलेल्या या कारवाईत, मास्क वा कापड परिधान न केलेल्या ११३१ व्यक्तींकडून एकूण ५ लाख ६४ हजार ९०० इतका दंड आकारण्यात आला आहे.
सध्याचा काळ हा लग्न सराईचा असल्यामुळे, बाहेर विशेषत: गर्दीच्या ठिकाणी कुठल्याही समारंभात वावरतांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन तसेच मास्क अथवा कापड परिधान करणे अत्यावश्यक आहे, सार्वजनिक ठिकाणी वावरतांना अथवा बाजारात, किराणा दुकान, मॉल या ठिकाणी जातांना नागरिकांनी मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.
551 total views, 1 views today