अत्यल्प उत्पन्न गटातील रहीवाशांकडून सोसायटीच्या अंर्तगत भागात छोटेखानी हायमस्ट तसेच पथदिव्यांची महापालिका प्रशासनाकडे सातत्याने मागणी केली जात असल्याचे समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहेे.
नवी मुंबई : कोपरखैराणे सेक्टर २३ परिसरातील श्रमिकांच्या ए टाईपच्या श्री लक्ष्मी को.ऑप. सोसायटी आणि श्री गणेश पंचमी को. ऑप सोसायटीच्या अंर्तगत भागात महापालिका प्रशासनाकडून पथदिवे तसेच छोटेखानी हायमस्ट बसवून तेथील अंधारावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची लेखी मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहेे.
महापालिका प्रभाग ४२ मध्ये कोपरखैराणे, सेक्टर २३ परिसरात अल्प उत्पन्न गटातील श्री लक्ष्मी को.ऑप. सोसायटी आणि श्री गणेश पंचमी को. ऑप सोसायटी या दोन गृहनिर्माण सोसायट्या असून जवळपास २२५ सदनिका या दोन सोसायटीमध्ये आहे. या दोन गृहनिर्माण सोसायट्याी पूर्णपणे एलआयजी टाईप असून येथे अल्प उत्पन्न गटातील श्रमिकांचे वास्तव्य आहे. महापालिका प्रशासनाकडून या सोसायटीच्या अंर्तगत भागात पथदिव्यांची उभारणी करून वीज व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहेे. या अत्यल्प उत्पन्न गटातील रहीवाशांकडून सोसायटीच्या अंर्तगत भागात छोटेखानी हायमस्ट तसेच पथदिव्यांची महापालिका प्रशासनाकडे सातत्याने मागणी केली जात असल्याचे समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहेे.
या श्रमिकांच्या सोसायटीत सांयकाळनंतर पूर्णपणे अंधार पसरत असून या अंधाराचा फायदा घेवून चोर्या होण्याची अथवा महिलांशी-मुलींशी छेडछाड होण्याचीही भीती आहे. सध्या मार्चमध्ये परिक्षा झाल्यावर येथील महिला आपल्या लहान मुलांसमवेत गावी जाण्याची शक्यता आहेे. या दोन गृहनिर्माण सोसायट्या खाडीकडील भागाकडे असून त्या ठिकाणाहून चोर आरामात अंधाराचा फायदा घेवून सोसायटीत शिरकाव करू शकतात. समस्येचे गांभीर्य पाहता या सोसायटी आवारात ठिकठिकाणी पथदिवे तसेच मोकळ्या सार्वजनिक जागेत हायमस्ट लवकरात लवकर बसवून देण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत. या ठिकाणी हायमस्ट तसेच पथदिवे बसल्यास चोरीची व इतर समस्यां निर्माण होणार नाहीत व येथील श्रमिकांना दिलासा प्राप्त होईल, असे समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
582 total views, 1 views today