वस्तू सेवा कर, ई कॉमर्स संदर्भात कॅटचा देशव्यापी आंदोलनाचा एल्गार

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यामध्ये आंदोलनाचे केंद्र उभारणार

मुंबई : वस्तू सेवा कर आणि ई कॉमर्स प्रणालीच्या विरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) घेतला आहे. त्या अनुषंगाने आपली रणनीती आखताना ५ मार्च ते ५एप्रिल दरम्यान देशातील व्यवसायिक संघटनांनी “आंदोलन मास” करण्याचा ठरवले आहे. कॅटच्या या आंदोलन मासात देशातील ४० हजाराहून अधिक व्यापारी संघटना सहभागी होतील असे कॅटचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी वेलफेयर महासंघाचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर यांनी सांगितले.
कॅटच्या या आंदोलन मास संदर्भात बोलताना सुरेशभाई ठक्कर म्हणाले की यावेळी आंदोलनाची दिशा ठरवताना कॅटने वेगवेगळ्या पातळीवर लढा देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार वस्तू सेवा कर आणि ई कॉमर्सच्या मुद्द्यावर देशातील प्रत्येक राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, अर्थमंत्री, अर्थ विभागाचे मुख्य सचिव, वस्तू सेवा कर आयुक्त यांना देण्यासाठी जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात येईल. याशिवाय देशातील विविध राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील पक्ष्यांच्या प्रमुखांनाही निवेदन देण्यात येणार आहे. १३ मार्च रोजी व्यापारी संघटना प्रत्येक जिल्ह्यात आपल्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करतील .२० मार्चला प्रत्येक जिल्ह्यात रॅली काढण्यात येईल. २६ मार्चला राज्यसभा आणि लोकसभेच्या प्रत्येक खासदारांच्या घरासमोर धरणे धरुन त्यांना घेराव घालण्यात येईल. याशिवाय प्रत्येक राज्यात व्यापाऱ्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन घेतली जातील. या आंदोलनाचा भाग म्हणून देशातील पाच विभागात विभागीय अधिवेशने आयोजित करतील. या अधिवेशनात त्या त्या विभागातील व्यापारी सहभागी होतील.

 522 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.