शहापूर – घाटघर रस्त्याचे काम मार्गी लागण्याची चिन्हे

अर्थसंकल्पीय अधिवेशनात शहापुरचे आमदार दौलत दरोडा यांचा तारांकित प्रश्न, रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी निधी उपलब्ध करण्याची अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांची मागणी

मुंबई (शामकांत पतंगराव ) : सुमारे वीस वर्षांपासून महाराष्ट्र शासनाच्या लालफितीत अडकलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर-घाटघर रस्त्याचे काम आता लोकप्रतिनिधींच्या प्रभावी मागण्यांमुळे आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या रस्त्यामुळे ठाणे व अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामिण भागातील विकासाला चालना मिळणार आहे.शहापूरचे आमदार दौलत दरोडा,माजी आमदार पांडुरंग बरोरा व अकोल्याचे आमदार डॉ.किरण लहामटे हे या रस्त्यासाठी आग्रही आहेत.
ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील देवीचा घाट नावाने प्रसिध्द असलेल्या डोळखांब- चोंढे- घाटघर- शेंडी-वाकी- राजूर- अकोले-संगमनेर असा ५० किलोमीटर अंतराचा रस्ता प्रस्तावित असून सन २००१ मध्ये त्याचे सर्वेक्षण सुध्दा झाले होते.रस्त्याच्या पुनर्सर्वेक्षणसाठी तत्कालीन सरकारने सन २०१६ -१७ आर्थिक संकल्पात पन्नास लाख रुपयांची तरतूद केली होती,या नंतर हे काम मार्गी लागेल असे वाटत असतानाच पण वनविभागाच्या विविध परवानग्या अभावी रस्त्याचा कामाला खिळ बसली.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील ग्रामीण भागाचा विकास साधायचा असेल तर शहापूर-घाटघर हा रस्ता होणे गरजेचे असल्याने आहे.शहापूरचे आमदार दौलत दरोडा,माजी आमदार पांडुरंग बरोरा व अकोल्याचे आमदार डॉ.किरण लहामटे हे या रस्त्यासाठी आग्रही आहेत.
सध्या मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज(दि.२) या रखडलेल्या रस्त्याविषयी आमदार दौलत दरोडा यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. तर अकोल्याचे आमदार डॉ.किरण लहामटे यांनीही या रस्त्याच्या कामाचे शक्याशक्य अहवाल तयार करणे व भूसंपादन करणे व सर्वेक्षण कामासाठी अंदाजे ६७५ लक्ष इतका खर्च असून त्यास अर्थ संकल्पात मंजुरी मिळावी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रव्यवहार केला आहे.तसेच माजी आमदार पांडुरंग बरोरा व शेतकरी नेते बबन हरणे यांचेही प्रयत्न सुरूच आहेत.मागच्याच महिन्यात या सर्वांनी सात किलोमीटर अंतर पायी चालून रस्त्याची पाहणी केली आहे.
नेहमीच्या रस्त्यापेक्षा या रस्त्यामुळे मुंबईकडे जाताना वेळ व इंधनाची बचत होईल.पर्यटनाला चालना मिळेल व उद्योग व्यवसायात प्रगती होईल म्हणून देवीचा घाट रस्त्यासाठी शहापूर व अकोल्याच्या  आमदारांनी कंबर कसली आहे.
“सर्वेक्षणासाठी २०१६-१७ अर्थसंकल्पीय अधिवेशनात पनान्स लाख रुपयांची तरतूद केली होती व निविदाही प्रसिध्द केल्या होत्या, परंतु त्यास प्रतीसाद मिळाला नाही.सन  २०२१-२२ मध्ये निधीच्या  उपलब्धतेनुसार वाढीव तरतूद करण्याचे नियोजन असून रस्त्याचा बांधकामा बाबत निकष, मंजुरी व निधी उपलब्धतेच्या अधिन राहून काम हाती घेण्यात येईल!” असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणयांनी सांगितले.
हा रस्ता शहापूर तालुक्यातील डोळखांब,तळवाडे, मेट,हिंगळूद या गावांच्या हद्दीतून जाणार असल्याने पारंपरिक रस्त्यापेक्षा या रस्त्याने प्रवास केल्यास ४४ किलोमीटर अंतर वाचणार आहे.

 741 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.