कल्याणची सागर कन्या श्रावणी जाधवचा नवा विक्रम

एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हे १४ किलो मीटरचे सागरी अंतर ३. तास ४३ मिनिटात पोहून पूर्ण करत नवा विक्रम रचला

कल्याण : ठाणे जिल्हा जलतरण संघटनेची कल्याण येथील जलतरण खेळाडू श्रावणी संतोष जाधव हिने एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हे १४ किलो मीटरचे सागरी अंतर ३. तास ४३ मिनिटात पोहून पूर्ण करत नवा विक्रम प्रस्थापित केला. कल्याणची सागर कन्या म्हणून ओळख असणारी श्रावणी जाधव हिने पोहून हे अंतर पार केले. दोन वर्षांपूर्वी जागतिक विक्रम करणारी कल्याणची डॉली पाटील त्यानंतर तिच्या पावलावर पाऊल ठेवत श्रावणी जाधवने मोठी मजल मारली आहे..
श्रावणी हिने हे अंतर पार केल्यानंतर तिला शुभेच्छा देण्यासाठी मुंबईच्या माजी महापौरस्नेहल आंबेकर व स्थायी समिती सदस्या नगरसेविका सुजाता सानप आणि स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे किशोर शेट्टी उपस्थित होते. जागतिक सागरी विक्रम करणारी रुपाली रेपाळे ह्यांनी निरीक्षक म्हणून काम पहिले.
श्रावणी हिला पहिल्यापासून जलतरणाचे आवड घरामधूनच वडील संतोष जाधव व आई संध्या जाधव यांच्याकडून जलतरण..या खेळाची बाळकडू मिळाले. नियमित सराव आणि इच्छाशक्तीच्या जोरावर तिने अनेक जिल्हा व राज्य स्पर्धा गाजवल्या. तसेच स्पर्धांमधून स्विमिंग करून नुसती पदके घेण्यापेक्षा काहीतरी वेगळे करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगुन श्रावणीने दिर्घ पल्ल्याच्या सागरी जलतरणात वेगळे काहीतरी करायची इच्छा बोलून दाखवली त्यानंतर तिच्या प्रशिक्षकांनी काटेकोर वेळापत्रक आखून तिचा सराव सुरू केला आणि सरावामध्ये कुठेही मागे न पडता श्रावणीने आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी समुद्रात उडी घेतली आणि विक्रम प्रस्थापित केला.कल्याणच्या तलावामध्ये श्रावणी सराव करत होती. सरावादरम्यान
तिला देविदास पाटील व संतोष पाटील याचे मार्गदर्शन मिळाले. कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर, महापौर विनिता राणे यांनी या यशाबद्दल श्रावणीचे अभिनंदन केले

 436 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.