पेट्रोल व डिझेलवरील महसूलात सुट द्या : नामदेव भगत

बंगाल व आसाम या राज्य सरकारने कालच पेट्रोलवरील राज्य महसुलात सुट दिल्याचा दाखला दिला नामदेव भगत यांनी

नवी मुंबई : पेट्रोल व डिझेलच्या सततच्या वाढत्या किंमतीने महागाई वाढीला हातभार लागत असून सर्वसामान्यांचे आधीच महागाईने कंबरडे मोडले आहेे. पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली असून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलच्या महसुलात सुट देण्याची मागणी माजी सिडको संचालक व शिवसेनेचे नवी मुंबई महापालिकेतील माजी ज्येष्ठ नगरसेवक नामदेव भगत यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहेे.
बंगाल व आसाम या राज्य सरकारने कालच पेट्रोलवरील राज्य महसुलात सुट दिल्याचा दाखला देत नामदेव भगत यांनी निवेदनात त्या दोन राज्यातील निवडणूका जवळ आल्या असल्याने तेथील सरकारने कदाचित तसा निर्णय घेतला असण्याची शक्यता व्यक्त केली आहेे. तथापि महाराष्ट्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील राज्य महसूलात प्रती लीटर ४ ते ५ रूपये सुट दिल्यास राज्यकर्ता आपली भूमिका समजावून घेतोय, महागाईच्या काळात आपल्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करतोय अशी सर्वसामान्य जनतेची आपल्याविषयी भावना निर्माण होईल. एक कार्यकर्ता म्हणून आपण निवेदनातून आपली भूमिका मांडत असल्यानेे पेट्रोल व डिझेलवरील राज्य महसूलात सूट देवून महाराष्ट्रीयन जनतेला दिलासा देण्याची भूमिका नामदेव भगत यांनी निवेदनातून मांडली आहे.
कोरोनाचा जगभरात उद्रेक झाला असताना महाराष्ट्र सरकारने कोरोना नियत्रंणात आणण्यासाठी करत असलेेल्या प्रयत्नांचीही नामदेव भगत यांनी निवेदनातून प्रशंसा केली आहे.

 295 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.