ठाण्यातील व्यापाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन

व्यापाऱ्यांना डोकेदुखी ठरलेले काळे कायदे सरकारने मागे घेण्याची केली निवेदनात मागणी

ठाणे :  देशातील व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या ठाण्यातील सदस्यांनी वस्तू सेवाकरातील जाचक अटी आणि ई कॉमर्स कपन्यांच्या कुटील व्यापार धोरणाच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणारे निवेदन आज जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे सोपवले.
कॅटचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी वेलफेयर महासंघाचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर म्हणाले, कॅटने २६ फेब्रुवारी रोजी पुकारलेल्या देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सुरेशभाई ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या एका शिष्टमंडळाने हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 
वस्तू सेवा कराच्या कलम २९ च्या नियम २१ न्वये  अधिकाऱ्यांना सुनावणी न करता नोंदणी रद्द करण्याचा दिलेला अधिकार, विक्रेत्यांनी परतावा न भरल्यास त्यांच्या इनपुट वर बंदी आणणे, वस्तू सेवा कर नियम २ अ, २ ब ची अंमलबजावणी करणे, ताळेबंद न जुळल्यास खाते बंद करणे, ई वे बिल १०० ऐवजी २०० किलोमीटर पर्यत लागू करणे, अपिल केल्यास १०टक्क्यांऐवजी २५ टक्के रक्कम जमा करणे, सीलबंद वस्तू साठी व्यापाऱ्यांवर कारवाई करणे, एक महिनाआधी परवान्यांचे नुतनीकरण न केल्यास दरदिवशी १०० रुपये दंड आकारणे, ई कॉमर्स कंपन्यांनी वस्तू सेवा कराच्या पेक्षा कमी किमतीत विक्री केल्यावर कारवाई करणे, ऑन लाईन कंपन्यांवर व्यापार संबधित कायदे लागू करणे आदी मागण्या य निवेदनात केल्या असल्याचे सुरेशभाई ठक्कर यांनी सांगितले. यावेळी सुरेशभाई ठक्कर यांच्यासह शंकरभाई ठक्कर, अमरशी कारिया, उदय ठक्कर, केशव पांडे आणि शहरातील इतर व्यापारी उपस्थित होते.

 636 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.